सोशल मीडियावर हिंसक द्वेष पसरवणाऱ्या पोस्टवर नातेपुते पोलिसांचा वॉच, होणार कारवाई
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातून समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार त्यामुळे नागरिकांनो सावधान, अफवा पसरविणार्यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नातेपुते पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या नातेपुते शहरातील व परिसरातील नागरिकांना दिला आहे. आगामी काळात रमजान ईद, रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती आदी विविध सण-उत्सव साजरे होत आहेत. परंतु, सध्या सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना इतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.शहरात सामाजिक शांतता राहावी, यासाठी नातेपुते पोलिस प्रशासनाने सोशल मीडिया वापरणारावर वॉच ठेवला असून.व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबूक आदी सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह मेसेजला कोणताही प्रतिसाद न देण्याचे आवाहन नातेपुते पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतेही बेकायदेशीर आणि वाद होऊ शकतात असे संदेश फॉरवर्ड करू नयेत. आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. हिंसक द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट शेअर करू नये, जातीय तेड निर्माण होईल व धार्मिक भावना दुखावल्या जातील असे व्हिडिओ फोटोज व मेसेजेस वायरल करू नये. अन्यथा आक्षेपार्ह पोस्ट, फोटोज व्हिडिओ शेअर करणाऱ्या विरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्याकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या नागरिकांना दिला आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरत असाल तर सावधान कोणत्याही प्रकारचे जातीय तेड निर्माण होईल अशा पोस्ट वायरल करू नका अन्यथा पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या कडक कायदेशीर कारवाईस बळी पडाल.
0 Comments