माशाळे वस्ती येथील ब्रम्हाकुमारी लाईट हाऊस सेवाकेंद्रात शिवध्वजारोहण साजरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 5, 2025

माशाळे वस्ती येथील ब्रम्हाकुमारी लाईट हाऊस सेवाकेंद्रात शिवध्वजारोहण साजरे

 माशाळे वस्ती येथील ब्रम्हाकुमारी लाईट हाऊस 

सेवाकेंद्रात शिवध्वजारोहण साजरे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय  विश्वविद्यालय ही एक आध्यात्मिक संस्था असून या संस्थेची स्थापना १९३७ रोजी करण्यात आली होती. १४७ देशांमध्ये या संस्थेच्या ८,५०० शाखा असून , हैद्राबाद नगर येथे लेखराज कृपालनी यांनी या संस्थेचे बीजरोपण केले होते. आधुनिक युगामध्ये अध्यात्माचा ओढा कमी होत चालला आहे . मानवाला अध्यात्माची आठवण करून देण्याचे काम  प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माध्यमातून  केले जात असल्याचे मत दैनिक पुण्यनगरी चे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण यांनी व्यक्त केले.

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माशाळे वस्ती, सोलापूर येथील लाईट हाऊस सेवा केंद्रात कृष्णकांत चव्हाण यांच्या हस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सोमप्रभा दीदी, व इंटरगिरी मठाच्या मातोश्री  पुष्पलता दीदी  यांची विशेष उपस्थिती होती.ब्रम्हाकुमारी सोमप्रभा दीदी यांनी महाशिवरात्रीचे आणि शिवआराधनाचे महत्त्व सर्वांना सांगितले,या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे.   सुजाता दीदी,सदीक्षा दीदी यांनी स्वागत करून भक्तांना शिवाच्या अध्यात्मिक रहस्याची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.

दैनिक पुण्यनगरीची उपसंपादक कृष्णकांत चव्हाण यांच्या  हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती..कार्यक्रमचे सूत्रसंचालन बाळू भाई यांनी केले, तर  आभार पुजारी भाई यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर भाई ,पुजारी भाई,योगेश भाई,,वालू भाई, साहेबराव  परबत यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages