राष्ट्रीय कार्यशाळेसाठी विमानाने जाणार सहा महिला सरपंच - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 3, 2025

राष्ट्रीय कार्यशाळेसाठी विमानाने जाणार सहा महिला सरपंच

 राष्ट्रीय कार्यशाळेसाठी विमानाने जाणार सहा महिला सरपंच


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय महिला दिन अनुषंगाने पंचायत राज्य विभागाकडून महिला सक्षमीकरणासाठी महिला सरपंच पदाधिकारी व अधिकारी यांची दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड झाली आहे.  

या मध्ये पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडीच्या सरपंच रोहिणी सारंग जाधव, अनिता प्रदिप लोखंडे (ग्रामपंचायत तिसंगी), मोहोळ तालुक्यातील लक्ष्मी वागज, मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी च्या  सरपंच वैशाली पांडुरंग माळी, दक्षिण सोलापूर मधील भंडारकवढे च्या सरपंच वर्षा सिध्दराम भंडारकवठे, तर टेंभुर्णी च्या सरपंच सुरजा योगेश बोबडे, यांची या कार्यशाळा  साठी निवड झाली आहे.  या कार्यशाळा साठी  देशभरातून ११९० महिला सरपंच प्रतिनिधींची निवड झाली आहे . दिल्ली येथील विज्ञान भवनात हा कार्यक्रम होणार आहे.  त्यामध्ये महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातून महिला सरपंचांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सहा महिला सरपंचांची निवड करण्यात झाली आहे . यामध्ये जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे गटविकास अधिकारी  महेश पाटील यांची अधिकारी म्हणून या  कार्यशाळेसाठी म्हणून निवड करण्यात झाली आहे.  ही कार्यशाळा चार व पाच मार्च २०२५ रोजी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे दोन दिवस चालणार आहे. महाराष्ट्र सदन येथे या महिला सरपंचाची महाराष्ट्र सदन येथे खास व्यवस्था  करणेत आलेली आहे. खास विमानाने या सरपंच दिल्ली येथे जात आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages