Hot Posts

6/recent/ticker-posts

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी जनतेची लूट

 हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी जनतेची लूट

गुजरातमध्ये नंबर प्लेटसाठी कमी दर 

आणि महाराष्ट्रात अधिक असा भेदभाव का



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सुरक्षेच्या कारणास्तव २०१९ पूर्वीच्या देशभरातील वाहनांचे नंबर प्लेट बदलण्याच्या निर्णयात वाहनधारकांची लूट होत असून केंद्रीय मोटार वाहन कायदा संपूर्ण देशभरासाठी लागू असताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये नंबर प्लेटसाठी वेगवेगळे दर ठेवल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. गुजरातमध्ये नंबर प्लेटसाठी कमी दर आणि महाराष्ट्रात अधिक असा भेदभाव दिसत असल्याने महाराष्ट्रातील जनतेची लूट होत असल्याची भावना वाहनधारकांमध्ये निर्माण झाली आहे.सुरक्षेच्या कारणास्तव (हाय सिक्युरिटी) नंबर प्लेट बदलून घेण्याचे आवाहन सरकारकडून वाहनधारकांना करण्यात आले आहे. २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी हा कायदा लागू राहणार असला तरी वेगवेगळ्या २३९०१४००७४९ वाहनांना वेगवेगळे शुल्क ते सुध्दा वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे शुल्क ठेवल्याने ही वाहनधारकांची लूट नव्हे का? अशी विचारणा करणारे शेकडो फोन दररोज आरटीओ अधिकाऱ्यांना जात आहेत; परंतु अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने वाहनधारकांचा संताप वाढत आहे. महाराष्ट्रात दुचाकी वाहनांना ४५० रुपये असून गुजरातमध्ये केवळ १६० रुपये आकारले जात आहे. गोव्यात १५५, आंध्र प्रदेशमध्ये २४५ तर झारखंडमध्ये गुजरातमध्ये ४६०, महाराष्ट्रात ७४५, झारखंडमध्ये ५४० आणि आंध्र प्रदेशमध्ये ६१९ रुपये शुल्क ठेवल्याचे सांगण्यात येते. नंबर प्लेट बदलून देण्याचे रॉरमेत्रा सेफ्टी सिस्टिम लिमिटेड,रिअर मेझॉन इंडिया लिमिटेड आणि एफटीए एचएसआरपी सोल्युशन प्रा. लिमिटेड या तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असून नंबर प्लेट शुल्कशिवाय नंबर प्लेट बसविण्यासाठीही ज्यादा पैसे घेतले जात असल्याच्या वाहनधारकांच्या तक्रारी आहेत.३० मार्चपर्यंत नंबर प्लेट बदलून घेण्याची मुदत होती. मात्र, लाखो वाहनधारकांना अगदी कमी कालावधीत नंबर प्लेट बसवून देणे शक्य नसल्यामुळे सरकारने ही मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविली आहे.


आम्ही अंमलबजावणी यंत्रणा सुरक्षेच्या कारणास्तव २०१९च्या अगोदरील वाहनांचे नंबर प्लेट बदलून घेण्यासाठीचे दर केंद्र सरकारने ठरविलेले आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी आमची यंत्रणा आहे. मात्र, वेगवेगळ्या राज्यात वाहनांना वेगवेगळे शुल्क का ठेवले आहे, याबाबत वाहनधारकांकडून विचारणा करणारे अनेक फोन आम्हाला येत आहेत. मात्र, आम्ही निर्णय घेणारे नसून अंमलबजावणी करणारे आहोत, असे सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी सांगितले. 

नंबर प्लेटचे शुल्क असे आहेत
 राज्य     दुचाकी    रिक्षा    कार    अवजड वाहन
महाराष्ट्र    ४५०       ५००   ७४५       ७४५
आंध्र प्रदेश   २४५      २८२   ६१९       ६४९
गुजरात       १६०      २००   ४६०       ४८०
झारखंड      ३००       ३४०   ५४०     ५७०
गोवा          १५५   १५५   २०३     २३२
हे शुल्क जीएसटी वगळून आहेत. 

Reactions

Post a Comment

0 Comments