हायटेक इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 3, 2025

हायटेक इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

हायटेक इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात 


येणेगूर  (कटूसत्य वृत्त):-येथील हायटेक इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. याचे उद्घाटन एन. आर. पाटील डेव्हलपर्सचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्या हस्ते झाले. या स्नेहसंमेलनात नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. कलाप्रेमींनीही विद्यार्थ्यावर बक्षिसांचा वर्षाव केला. कार्यक्रमास सपोउपनि गाडेकर, सरपंच रेखा गुंजोटे, महालिंगरायवाडीच्या सरपंच माने, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल्य बोने मुख्याध्यापक बळीराजा घोरवडे, ग्रामपंचायत अधिकारी एस. टी. बलसुरे, पोलिस अंमलदार विजय साळुंखे, दिनेश पाटील, समन्वयक प्रकाश कंटेकुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधव जाधव, शुभांगी वाघमोडे, प्रास्ताविक लक्ष्मण जकेकुरे यांनी केले. आभार संध्या सागर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य सरस्वती मोरे, शिक्षिका अलका हिंगमिरे, पोद्दार, चेंडके, मंगरुळे, कांबळे, हरप्पा मंडले, प्रतीक मुळे, बबन लिंबाळे, प्रेमनाथ सगर, धीरज हीपरगे, वसीम शेख, अबान गोंधळी आदींनी पुढाकार घेतला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages