महात्मा गांधी विद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
करमाळा (कटूसत्य वृत्त):- येथील महात्मा गांधी विद्यालयात मा. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपमुख्याध्यापक अनिस बागवान यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सहशिक्षक सचिन अब्दुले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला. मा. आमदार स्वातंत्र्य सैनिक स्व. नामदेवराव जगताप यांचा आणि यशवंतराव चव्हाण यांचा स्वातंत्र्याच्या चळवळीत आलेला संपर्क, त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आलेल्या उजनी धरणाच्या निर्मितीचा इतिहास, नामदेवराव जगताप यांच्या सांगण्यावरून धरणाची बदललेली जागा, सोलापूर जिल्हा परिषदेची, जिल्हा बँकेची स्थापना, कुटीर रुग्णालय, एस.टी.डेपो यासह महात्मा गांधी विद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या शैक्षणिक संस्था उभारताना यशवंतराव चव्हाण यांचे झालेले सहकार्य या सर्व बाबींचा यावेळी उजाळा कऱण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कोरडे यांनी केले.
0 Comments