इतिहासातील मढी उकरून नेमका कुणाचा फायदा?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचे राजकारण चांगलेच तापले आहे.या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, इतिहासातली मढी उकरुन काढण्याची खोड वाईटच आहे. गेली ३५-४० वर्ष हिंदू-मुस्लीम धर्मांधता पेटती ठेवण्यासाठी जुनी पुराणी मढी उकरून त्याभोवती देशाचं राजकारण सत्तेसाठी पिंगा घालण्यात दंग आहे.त्यात आता औरंगजेबाच्या कबरीची भर पडलीय.
छत्रपती शिवाजी महाराज हयात असेपर्यंत औरंगजेबानं दख्खनमध्ये पाऊल ठेवण्याचं धाडस केलं
नाही. कारण त्याला भीती होती की आपण माघारी जाऊ शकणार नाही.शिवरायांच्या निधनानंतर दोन वर्षांनी तो स्वतः पाच लाख सैन्यांसह दख्खनेत आला. पण त्याची गाठ छत्रपती संभाजी महाराज नावाच्या छाव्याशी पडली.संभाजीराजांनी न थकता सतत नऊ वर्षे मोगल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रुविरुध्द निकराचा लढा दिला.मोघल फौजांना, साक्षात औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. मराठा साम्राज्य जिंकण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळवलं. याच द्वेषातून औरंगजेबानं संभाजीराजांना अतोनात हाल करून कपटानं मारलं. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर ताराराणी आणि त्यांच्या मावळ्यांनी औरंगजेबला 'कबी'त घालण्याचं ऐतिहासिक कार्य केलं. पण त्यांनी त्याच्या इच्छेनुसार खुलताबादला त्याची 'कबर' होऊ दिली. यातून त्यांनी शिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवला.मंदिर- मशिदीच्या जागांवरून,
कबरीवरुन वाद होणं चांगलं नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या काळात देशाची प्रगती चांगली होते.
भावनिक मुद्दयांना जेव्हा महत्व येतं,तेव्हा लोकांचे मूलभूत प्रश्न मार्ग पडतात. इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगताना ते प्रगतीच्या गळ्यातील लोढणं होणार नाही; याची दक्षता घेतली पाहिजे. सामोपचार आणि सामंजस्यानं ऐतिहासिक वादावर तोडगा काढला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
वैभवशाली इतिहासाचा अभिमान असायला हवा; परंतु इतिहासातील मढी उकरून काढून त्यातून हाती काय लागणार ? हे तपासलं पाहिजे. एकीकडं देश भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार,गुन्हेगारी, जातीयवाद अशा प्रश्नांनी जळत असताना दुसरीकडे माथी भडकविणारे विषय उकरुन हेतुपुरस्सर जनतेचे लक्ष भटकविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे परखड मत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमल साळुंखे-ढोबळे यांनी मांडले.
0 Comments