Hot Posts

6/recent/ticker-posts

गणपती फार्मसीचा थ्रो बॉल स्पर्धेमध्ये कृष्णा फार्मसी कराडवरती दणदणीत विजय

 गणपती फार्मसीचा थ्रो बॉल स्पर्धेमध्ये कृष्णा फार्मसी कराडवरती दणदणीत विजय




टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- धनलक्ष्मी फाउंडेशन कराड लेट ॲड. दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी माळवाडी मसूर, डिप्लोमा इन फार्मसी स्पोर्ट्स असोसिएशन (एसकेएस फार्मा स्पोर्ट्स-२के२५), इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (आयपीए), असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स (एपीटीआय) यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत कराडच्या कृष्णा फार्मसी कॉलेजचा पराभव करत गणपती फार्मसीने विजय मिळवला. राज्यातील ३६ फार्मसी महाविद्यालयाचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत तीव्र स्पर्धा आणि खिलाडूवृत्ती दिसून आली. गणपती फार्मसी च्या संघाने संपूर्ण सामन्यात उल्लेखनीय कौशल्य आणि सांघिक कामगिरीचे प्रदर्शन केले. शेवटी त्यांच्या जबरदस्त प्रतिस्पर्धांविरुद्ध योग्य विजय मिळवला. गणपती फार्मसीच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले. या स्पर्धेमध्ये संजीवनी मासाळ,प्राजक्ता शिंदे, काजल रजपूत, वैष्णवी सलगर, कृतिका वैद्य, राजलक्ष्मी दुपडे आणि सोनाली तळेकर यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव डॉ. आर.डी. बेंदगुडे, अध्यक्ष ॲड, विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील या संघास  धनश्री कारंडे,  रूपाली राऊत,  पूजा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments