वैराग नगरपंचायतीकडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
वैराग (कटूसत्य वृत्त):- समाजातील प्रत्येक घटकाला ज्या त्या परीने वेळोवेळी घडवण्याचा प्रयत्न
करणाऱ्या आणि आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान वैराग नगरपंचायतीच्या वतीने रविवारी (दि. १६) करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून
सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी अंजली मरोड ह्या उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैराग नगरपंचायतीने रविवारी शहाजीराव पाटील सांस्कृतिक भवनमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजातील उल्लेखनिय काम करणाऱ्या रंगिणीना पुरस्कार देवून सन्मानात येत आहे. माजी जि. प. सदस्या रेखा भूमकर ह्या होत्या. सन्मानित करण्यात आलेल्या महिलांमध्ये सफाई कर्मचारी तारामती लोंढे, उत्कृष्ट माता कमल घोटकर,संयुक्त कुटुंब आणि उत्तम धार्मिक कार्य कुसूम कासार, उद्योजिका लीना भूमकर,सुसंस्कृत माता भगीरथी ऐनापुरे, उत्कृष्ट आरोग्य सेवा कुसूम दळवी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, सुपरवायझर, आशा वर्कर आणि विद्यार्थिनींना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी महिला आणि बालकल्याण सभापती जैतूनबी बागवान, डॉ. मधुरा बाजारे, प्रा.अनिता मोहिते, डॉ.संगीता देशमुख,नगरसेविका तृप्ती भूमकर, आस्मा मिर्झा, पद्मिनी सुरवसे, गुरुबाई झाडमुखे, जयश्री घोडके, राणी आदमाने, अर्चना माने, आशादेवी वाघ यांच्यासह अनेक महिला वर्ग उपस्थित होत्या. या कार्यक्रमास नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन रेड्डी यांनी केले तर आभार नगरसेविका तृप्ती भूमकर यांनी मानले.
0 Comments