Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी येथील 'शितल ज्वेलर्स'चे बबनदादा शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन

 टेंभुर्णी येथील 'शितल ज्वेलर्स'चे बबनदादा शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन




टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथे पुणे-सोलापूर महामार्गावर 1. शितल गारमेंट शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या 'शितल ज्वेलर्स' या नूतन भव्य शोरूमचे उद्घाटन गुरुवार, दि.२७ मार्च ग रोजी सकाळी ११.५५ वाजता माढा तालुक्याचे आमदार शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विजयकुमार कोठारी, संजयकुमार कोठारी आणि राजेंद्रकुमार नी कोठारी यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे.

यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, सुनिल मोरे, माजी सभापती शिवाजी कांबळे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तुकाराम ढवळे, पुण्याचे उद्योजक राजेंद्र देशमुख, टेंभुर्णी सरपंच सौ. सुरजा बोबडे, विठ्ठल शिंदे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक  बाळासाहेब ढवळे, टेंभुर्णी चे माजी सरपंच प्रमोद कुटे, माजी सभापती संजय पाटील-भिमानगरकर,
सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष महावीर गांधी, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, गिरीश शहा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, इंदापूरचे प्रवीण माने, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, बँक रिजनल हेड सोलापूर राजीव दुबे, पंढरपूर मर्चेंट बँकेचे चेअरमन शितल तांबोळी, राजू शेटे, सुधीर तेली, पंढरपूरचे शिरीष कटेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या उद्घाटनप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चेतन कोठारी, शुभम कोठारी, सन्मुख कोठारी, प्रसाद कोठारी यांनी केले आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे शितल ज्वेलर्स हे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये एकमेव असे सोने-चांदीचे ज्वेलर्स असून ते आजोबा पासून त्यांचा पिढीजात व्यवसाय असल्याने त्यांनी आतापर्यंत टिकवला आहे त्यामुळे माढा , करमाळा इंदापूर माळशिरस, या भागातून प्रगतशील बागायतदार व व्यावसायिक व्यापारी शेतकरी सर्वजण शितल ज्वेलर्स वर विश्वास ठेवून आत्तापर्यंत येत आहेत तोच विश्वास टिकवण्यासाठी त्यांनी नूतन शितल ज्वेलर्स चे स्थलांतर टेंभुर्णी येथील सोलापूर पुणे हवे राष्ट्रीय महामार्गावर जगदंबा कॉटेज  समोर केले असून सर्वांनी या ठिकाणी उद्घाटनाला भेट द्यावी अशी कोठारे बंधूंच्या वतीने विनंती केली आहे
Reactions

Post a Comment

0 Comments