राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये ग्रीन फिंगर्स महाविद्यालयाचे घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 13, 2025

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये ग्रीन फिंगर्स महाविद्यालयाचे घवघवीत यश

 राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये ग्रीन फिंगर्स महाविद्यालयाचे घवघवीत यश



अकलूज (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संगणक शास्त्र संकुलाच्या वतीने डेक्स्टर इनोफेस्ट 2024 25 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या 298 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये कोडिंग स्पर्धा ,पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा व पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा चा समावेश होता.
पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये संगणक क्षेत्रातील विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य वापरून पोस्टर तयार केले व त्याचे सादरीकरण केले.
 यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग,ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी,काँटम कम्प्युटिंग इत्यादी विविध संगणक क्षेत्रातील विषयांचा समावेश होता.
या स्पर्धेचे उद्घाटन संगणक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉ. आर.एस मेंते यांच्या हस्ते झाले पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये ग्रीन फिंगर्स महाविद्यालयाच्या बीएससीएस भाग दोन च्या विद्यार्थिनी कुमारी अदिती पराडे व कुमारी भूमिका मगर यांनी  ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या विषयावर विद्यार्थ्यी नी सर्वोत्तम सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेमधील विजेत्यांचे अभिनंदन व बक्षिस वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महारनवर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद माने यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये आर एम पवार एस एस शाकापुरे,यूएस दोडमिसे व के एस काझी यांनी परीक्षकांचे काम पाहिले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संगणक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. आर एस मेंते, डॉ. जे.डी माशाळे, डॉ .ए आर शिंदे डॉ. एस डी राऊत प्रा. सी.जी.गार्डी चौगुले यांनी विशेष काम पाहिले.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संगणकशास्त्र सह अनेक महाविद्यालयाने त्यामध्ये उत्साह पूर्ण सहभाग नोंदवला होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शिंदे व सर्व विभाग प्रमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे  व संघ प्रमुख प्राध्यापिका धनश्री हातोळकर यांचे अभिनंदन केले व सर्वांना सन्मानित केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages