सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती माने,हसापुरे भाजपसोबत ?
सोलापूर (कटूसत्यवृत्त):- श्री सिध्देश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली आहे. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच ४०० च्या पुढे उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्राप्त अर्जाची छाननी १ मार्च रोजी होणार आहे. या छाननीनंतरच किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रमुख भूमिका बजावित असलेले दादा, साहेब, बापू, मालक यांसारख्या मंडळींकडे अनेक इच्छुक 'मला कोणी उमेदवारी देवा का उमेदवारी ? आतापासूनच फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे.
श्री सिध्देश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक पक्ष, पार्टी पेक्षा ज्या यांकडे विकास कार्यकारी यांची संख्या अधिक आहे तसेच दोन्ही तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर ज्यांचे वर्चस्व आहे. अशा नेत्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत अनन्यसाधारण महत्व आहे. माजी आमदार दिलीप माने, बाजार समितीचे माजी उपसभापती तथा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याकडे मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. पॅनल अद्याप अधिकृत झाले नसले तरी पुरे हे भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments