शासकीय कार्यालये खासगी जागेत सुरु
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक इमारती धूळ खात पडून
सोलापूर(कटुसत्य वृत्त):- शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक शासकीय इमारती या धूळ खात पडून आहेत. मात्र, शहरातील अनेक शासकीय कार्यालये या खासगी इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर चालविले जातात. स्वत:ची जागा असूनही भाड्याने चालविण्याचे कारण काय माहिती नाही. यामुळे शासनाच्या पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी ग्रामोद्योग, जिल्हा रेशीम अधिकारी, सहायक संचालक नगररचना, परिमंडळ ड, विद्युत निरीक्षक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सहायक निबंधक दक्षिण सोलापूर, सहायक निबंधक शहर यासह अन्य राज्य सरकारचे विविध विभागाचे कार्यालये हे भाड्याच्या इमारतीत सुरू
आहेत. यातील काही कार्यालये शोधूनही नागरिकांना सापडत नाहीत.
ग्रामीण भागातील एखाद्या नागरिकाला सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण
आणि जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी या कार्यालयांत शोधताना नाकी नऊ येतो. यामुळे, कोणत्या घटकासाठी कोणत्या योजना आहेत. याची माहिती होत नाही. हे कार्यालय
गजबजलेल्या ठिकाणी असणे आवश्यक आहे.
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी यासह अन्य अधिकाऱ्यांचे कार्यालय हे सध्या धूळ खात पडलेली आहेत. केवळ, अधिकारी यांच्या सोयीसाठीच हे कार्यालय अद्यापही खासगी जागेत चालू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय, हे कार्यालय जर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कार्यालयात चालू झाले तर शहरासह ग्रामीण भागातील लोकांना महिला बालकल्याण, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील नागरिकांसाठीच्या योजना कळतील. व या योजनांचा फायदा लोकांना होण्यास मदत होतील. तसेच, नागरिकांवर हे कार्यालय शोधण्याची वेळ येणार नाही. तसेच यामुळे दरमहिना खासगी इमारत मालकांना भाड्यापोटी दिले जाणारे हजारो रुपये वाचतील. शासकीय कार्यालयाच्या जागा वारंवार बदलत असल्याने नागरिकांना ते कार्यालय वेळेवर सापडत नाही. त्यामुळे त्यांचे हेलपाटे होतात, याचा त्रास नागरिकांना होतो.
0 Comments