आदिनाथच्या निवडणुकीमधून बागल गट दूर राहणार
गटाचे मार्गदर्शक घुमरे यांनी स्पष्ट केली भूमिका
करमाळा(कटुसत्य वृत्त):- निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या शेलगाव - भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक न लढविण्याचा निर्णय वागल गटाने घेतला आहे. वागल गटाकडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेण्यावावत सांगण्यात आले असून वागल गटाचा हा निर्णय या निवडणुकीवर वेगळा परिणाम करणार हे स्पष्ट झाले आहे.
आदिनाथवावत बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांनी भूमिका मांडली. गटाच्या समर्थकांची तसेच अर्ज दाखल केलेल्या समर्थक उमेदवारांची विचारविनिमय वैठक पार पडली. यावेळी घुमरे यांनी कारखाना निवडणूक लढावायची नाही, असे स्पष्ट केले. याप्रसंगी शिवसेना नेते मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय वागल उपस्थित होते.
याप्रसंगी भूमिका मांडताना घुमरे यांनी, बागल गटाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी सातत्याने, आतापर्यंत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष्य केले गेले आहे. पुन्हा असा प्रकार आदिनाथच्यावावतीत होऊ नये, यासाठी कारखान्याच्या निवडणुकीसाठी वागल गटाने थावण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये वागल गटाच्या राजकारणाला अडचणीत आणण्यासाठी आदिनाथ
कारखान्याला अडचणीत आणले गेले.
आदिनाथ सुरळीत चालावा, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. पुन्हा वागल गटाला अडचणीत आणण्यासाठी कारखान्याला अडचणीत आणले जाऊ नये. यासाठीच आम्ही या निवडणुकीत थांवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही फक्त निवडणुकीपुरते थांवलो आहोत. आदिनाथ व्यवस्थित चालण्यासाठी आमचे योगदान सातत्याने असेल, जो कोणी आदिनाथच्या सत्तेवर येईल त्याला वागल गटाचे सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी आदिनाथ निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार वागल गटाच्या नेत्या व भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी वागल व गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांना देण्यात आले असून ते जो निर्णय घेतील तो मान्य करण्याचे यावेळी ठरले. यावेळी वाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव वंडगर, माजी उपसभापती चिंतामणी जगताप, आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, कल्याणराव सरडे, रणजीत शिंदे, अंगद पाटील, केरू गव्हाणे, अॅड. नानासाहेव शिंदे हे गटाचे समर्थक उपस्थित होते.
0 Comments