आमदार कल्याणशेट्टी यांची विधानसभेत मागणी
अक्कलकोट (कटुसत्य वृत्त):- शहर आणि तालुक्याच्या काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती औरंगजेबाचे स्टेटस ठेवून तालुक्यातील वातावरण दूषित केले जात असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत केली. याप्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
मंगळवारी, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत कल्याणशेट्टी यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित
केला आणि सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान शहर व तालुक्यात काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने असे प्रकार घडत आहेत. शांतता, कायदा सुव्यवस्था आणि सलोखा अबाधित राहण्याच्या दृष्टीने योग्य नाही. याप्रकरणी राज्याच्या गृह विभागाकडून कारवाईचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी कल्याणशेट्टी यांनी केली.सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रूरकर्मा औरंगजेब याचे स्टेटस ठेवणाऱ्या शिवद्रोह्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे या मागणीसाठी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सरकार तातडीने कारवाई करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
0 Comments