कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर भाजपला यश-बैठकीत कल्याणशेट्टी यांचे प्रतिपादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 18, 2025

कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर भाजपला यश-बैठकीत कल्याणशेट्टी यांचे प्रतिपादन

 कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर भाजपला यश-बैठकीत कल्याणशेट्टी यांचे प्रतिपादन




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि संघटनात्मक ताकदीमुळेच भाजपला तालुक्यात घवघवीत यश मिळाले आहे, असे प्रतिपादन आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्यावतीने बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अमर साबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यावेळी आ. कल्याणशेट्टी बोलत होते. बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच बूथ स्तरावर कार्यकत्यांची सक्रियता वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणीत पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल आणि यशाबद्दल साबळे यांनी तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकत्यांचे अभिनंदन केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी झोकून देऊन काम करावे. त्यातही आपल्याला चांगले यश मिळेल, असा विश्वास साबळे यांनी व्यक्त केला. यावेळी शशिकांत चव्हाण, परमेश्वर यादवाड, प्रभाकर मजगे, विवेकानंद उंबरजे, अण्णप्पा बाराचारे, रामचंद्र होनराव, यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, दयानंद बिडवे, नन्नू कोरबू, विलास गव्हाणे, सातलिंगप्पा परमशेट्टी, महेश जानकर, अमर पाटील, राजेंद्र बंदीछोडे, जयशंकर पाटील, अरविंद ममनाबाद, अप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages