Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंडेंच्या 'आका'नंतर धसांच्या 'खोक्या'ला व्हीआयपी ट्रीटमेंट

 मुंडेंच्या 'आका'नंतर धसांच्या 'खोक्या'ला व्हीआयपी ट्रीटमेंट

 बीड (कटूसत्य वृत्त):-आमदार धनंजय मुंडे यांचा आका म्हणून आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडचा परिचय दिला. त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप झाला; परंतु आता याच धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे समोर आले आहे. खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी, सोबत डझनभर नातेवाईक, असा लवाजमा असलेला एक कथित व्हिडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरल झाला. शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील सतीश ऊर्फ बावी येथील ढाकणे बापलेकाला खोक्या भोसले याने बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. तसेच मारहाण करून दात पाडले होते. याप्रकरणी खोक्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. सोबतच वनविभागाच्या धाडीतही त्याच्या घरात वाळलेले मांस सापडल्याने वेगळा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांमध्ये तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments