ग्रीन फिंगर्स कॉलेजला "झील 2025 " चे सर्वसाधारण विजेतेपद
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्था व श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट अंतर्गत घेतले जाणारे वार्षिक स्नेहसंमेलन "झील 2025 संपन्न झाले .
यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ देण्यात येते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांंचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रमुख उद्देश ठेवून गेली अनेक वर्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न होतात.
या स्पर्धांमध्ये रांगोळी , मेहंदी ,कॉलेज स्पॉटलाईट प्रेझेंटेशन मुला-मुलींसाठी क्रिकेट स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धा व विविध शैक्षणिक स्पर्धा त्यामध्ये केस स्टडी प्रेझेंटेशन , रिसर्च पेपर प्रेझेंटेशन मेकिंग स्पर्धा या अशा विविध अंगी स्पर्धांचा समावेश होता.
या सर्व स्पर्धांचे नियोजन
शिवरत्न हॉर्स रायडिंग अकॅडमीच्या चेअरमन इशिता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत करण्यात आले.
या स्पर्धांमध्ये ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी ,विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च , शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज , शिवरत्न पॅटर्न अकलूज तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालय व फार्मसी कॉलेज या अशा अनेक महाविद्यालयाने यामध्ये सहभाग नोंदवला होता .
या स्पर्धेमधील सांस्कृतिक स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ शितलदेवी मोहिते पाटील अध्यक्ष शिवरत्न शिक्षण संस्था व इशिता मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे सर्व संचालक , पत्रकार , प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
बक्षीस वितरण प्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शितलदेवी मोहिते पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन नवीन ज्ञान , टेक्नॉलॉजीची माहिती मिळते तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होतो व आत्मविश्वास वाढतो यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने नवीन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन, आपल्या जीवनाची वाटचाल करावी व त्या विजेत्या सर्व संघांना व विद्यार्थ्यांना त्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .
*झील 2025 मध्ये स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे..*
रांगोळी डॉटेड तृतीय क्रमांक शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज द्वितीय क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग प्रथम क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज
रांगोळी फ्री हांड मध्ये तृतीय क्रमांक फार्मसी कॉलेज द्वितीय क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज प्रथम क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज. मेहंदी स्पर्धा मध्ये- तृतीय क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज द्वितीय क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज प्रथम क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज. स्पॉटलाईट मध्ये- प्रथम क्रमांक शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज द्वितीय क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज तृतीय क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज गर्ल्स क्रिकेट स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक शिवरत्न पॅटर्न व फार्मसी कॉलेज द्वितीय क्रमांक शंकराव मोहिते महाविद्यालय प्रथम क्रमांक .क्रिकेट बॉईज मध्ये तृतीय क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज द्वितीय क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज प्रथम क्रमांक फार्मसी कॉलेज. पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये- तृतीय क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज द्वितीय क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज प्रथम क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज. कथाकथन स्पर्धेमध्ये- तृतीय
क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज, द्वितीय क्रमांक फार्मसी कॉलेज, प्रथम क्रमांक शंकराव मोहिते पाटील कॉलेज. काव्यवाचन स्पर्धेमध्ये -तृतीय क्रमांक शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, द्वितीय विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज, व प्रथम शंकराव मोहिते महाविद्यालय तसेच केस स्टडी प्रेसेंटेशन मध्ये- तृतीय ग्रीन फिंगर्स कॉलेज , द्वितीय क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज, प्रथम क्रमांक शंकराव मोहिते महाविद्यालय. रिसर्च पेपर प्रेझेंटेशन मध्ये- तृतीय क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज, द्वितीय क्रमांक शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, प्रथम क्रमांक ग्रीन फिंगर कॉलेज .मेकिंग स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ,द्वितीय ग्रीन फिंगर्स कॉलेज आणि प्रथम क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग. बॉलीवूड डान्स स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज , द्वितीय क्रमांक शिवरत्न इन्स्टिट्यूट आणि प्रथम क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज थिम डान्स स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज प्रथम क्रमांक विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक शिवरत्न पॅटर्न द्वितीय क्रमांक , विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज , प्रथम क्रमांक ग्रीन फिंगर्स कॉलेज अशा पद्धतीने सर्वसाधारण विजेतेपद हे ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाला मिळालेले आहे. सर्वात जास्त गुण मिळवून त्यांनी हे विजेतेपद मिळवलेले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे व संचालक नितीन बनकर ,श्रीकांत राऊत, डॉ विश्वनाथ आवड ,अनिल जाधव ,प्रशासकीय अधिकारी अश्रफ शेख महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक भारत साठे डॉ . सुभाष शिंदे सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments