Hot Posts

6/recent/ticker-posts

मनोरमा बँकेस आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार

 मनोरमा बँकेस आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार

सोलापूर (कटुसत्य वृत्त): सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को. ऑप. असोसिएशनच्या वतीने मनोरमा बँकेस आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. सोलापूर जिल्ह्यातील ५०० कोटींवरील नागरी सहकारी बँकांमधून सन २०२१ ते २०२४ च्या आर्थिक व गुणवत्ता श्रेणीनुसार मनोरमा बँकेस आदर्श बँक प्रथम पुरस्कार मिळाला. मनोरमा बँकेने मार्च २०२४ अखेर १००३ कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असून सतत ६ वर्ष ०% एनपीए कायम राखला असून ९ नऊ शाखांसह कार्यरत आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी बँकेच्या यशाचे गमक सांगितले. मनोरमा बँकेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एफएसडब्ल्यूएम हा दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे दरवर्षी २ ते ३ शाखा काढण्याचा मानस असून ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी बँक असल्याचे मोरे यांनी सांगितले.

यावेळी मनोरमा परिवाराच्या मार्गदर्शिका शोभा मोरे, व्हा. चेअरमन संतोष सुरवसे, कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅड. सुरेश गायकवाड, संचालक दामोदर देशमुख, डॉ. ऋचा मोरे-पाटील, अश्विनी दोशी, कविता कुलकर्णी, गजेंद्र साळुंखे, गणपत कदम, संतोष मोटे, सुहास भोसले, प्रा. डॉ. बब्रुवाहन रोंगे, दत्तात्रय मुळे, प्रशांत शहापूरकर, विकास सक्री, बँकेच्या सीईओ शिल्पा कुलकर्णी (मोहिते) आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments