'फडणवीसांना जातीयवादानं पछाडलेलं आहे, मराठा समाजासोबत ते
बेईमान झाले'; टीका करत जरांगेचा पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा
वडीगोद्री(कटूसत्य वृत्त):-अंतरवाली सराटी येथे स्थगित केलेल्या सातव्या आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे हे परत आंदोलन करत असून यावेळी त्यांनी शनिवार (ता. 15) पासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी बोलताना जरांगे म्हणाले, शासनासोबत लढाईला आम्ही सज्ज आहे. सातवे आमरण उपोषण स्थगित करतेवेळी तात्काळ चार मागण्या मंजूर करण्यात येतील, असे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वतीने सांगितले. त्या बाबत 14, 15 दिवस झाले निर्णय झाला नाही. गॅजेट लागू करण्यात आले नाही.दाखल गुन्हे वापस घेतले नाही, सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, शिंदे समितीचे नोंदी शोधायचे काम व कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम चालू नाही, मुलीच्या मोफत शिक्षणाबाबत निर्णय होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून बेमुदत साखळी उपोषण चालू करत आहे. साखळी उपोषणामधून मागणी मंजूर झाली नाही, तर परत आमरण उपोषण करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी प्रत्येक गावातील नागरिक सहभागी होणार आहे. त्या नंतर राज्यात ठिकठिकाणी हे उपोषण होणार आहे. शासनाला परत एकदा मोठं आंदोलन करुन आमची ताकद दाखवणार आहे, असाही त्यांना इशारा दिला. मुंबईला जाण्याची घोषणा दोन-तीन दिवसांत करणार आहे. या वेळी आम्ही निर्णय होईपर्यंत माघारी येणार नाही. शासनाला हे आंदोलन जड जाईल. या दरम्यान मुंबईच्या दळणवळण, रस्ते वाहतूकबाबत शासनाने व्यवस्था करावी, ती जबाबदारी शासनाची आहे. मुंबईमध्ये लवकरच आझाद मैदान, शिवाजी पार्क या मैदानाची पाहणी दौरा करणार आहे. रस्त्यावरची लढाई सरकारला जड जाईल, फडणवीस यांच्या मनात आजही व्देष आहे. फडणवीस हे जातीयवादाने पछाडलेले आहे, खुन्नस कायम आहे. मराठा समाजासोबत फडणवीस बेईमान झाले. समाजाने त्यांना इज्जत दिली. सत्ता दिली. फडणवीस आपल्या मलीच्या परीक्षेकरता वर्षा बंगल्यावर राहायला जात नाहीत, मुलीच्या शब्दाला तुमच्याकडे किंमत आहे, आम्ही दिड वर्षांपासून आरक्षणाकरिता लढत आहे. आमच्या शब्दांना तुम्ही कधी किंमत देणार, असे जरांगे यांनी सांगितले. शिंदे समितीचे निर्णय लवकर होत नाही, विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासोबत दगा बाजी करू नये. आम्हाला गुन्हे परत घेण्याऐवजी नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे. आता सत्ता तुमची, बहुमत तुमचे मग आरक्षणासाठी वेळ का लावता, मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून काम करून घेतो, असं सांगितलं गेलं. मग, मुख्यमंत्री कशाला आहे? असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्याचे प्रमाणपत्र त्वरित द्या, नोंदी शोधायचे काम थांबवू नका, मुख्यमंत्री फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला नाही, असेही जरांगे म्हणाले.
.jpg)
0 Comments