सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने सुनील वाघमोडे सन्मानित
सोलापूर (कटुसत्य वृत्त) : लांबोटी येथील हॉटेल उद्योजक सुनील वाघमोडे यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराने बाणेर (पुणे) येथे सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने वाघमोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हॉटेल व्यवसायात भरारी घेतलेल्या वाघमोडे कुटुंबाला आतापर्यंत विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ग्राहकांची बदलत चाललेली मागणी लक्षात घेऊन सतत बदल केल्याने हा सन्मान झाल्याचे सुनील वाघमोडे यांनी सांगितले.
0 Comments