'मातीला पंख फुटताना' कादंबरीचे प्रकाशन
सोलापूर (कटुसत्य वृत्त): 'मातीला पंख फुटताना' ही कुमार कादंबरी शाळकरी मुलीच्या जिद्दीची कहाणी सांगते. ही कहाणी समाजातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले.
डॉ. स्मिता पाटील लिखित 'मातीला पंख फुटताना' या कादंबरीचे आणि 'नाही गिरवता येत कुठलीच लिपी' या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मनोरमा परिवाराचे संस्थापक श्रीकांत मोरे होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत पाटील (कोल्हापूर), मसाप पुणे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते.
मान्यवरांनी पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करताना 'मातीला पंख फुटताना'
ही कादंबरी अधिक प्रभावीपणे वाचकांच्या मनाचा ताबा घेणारी ठरल्याचे स्पष्ट केले. प्रारंभी प्रास्तविक व लेखिकेचे मनोगत डॉ. स्मिता पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन बापूसाहेब दळवे यांनी तर आभार डॉ. प्रमोद पाटील यांनी मानले. कार्यक्रमास उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे, डॉ. नसीम पठाण, जे.जे. कुलकर्णी, कवी मारुती कटकधोंड, गिरीश दुनाखे, राजेंद्र भोसले, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. श्रुती वडगबाळकर, वंदना कुलकर्णी, दिगंबर भगरे, डॉ. सुहास पुजारी यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते.
.jpg)
0 Comments