झेडपीजवळील अतिक्रमण हायकोर्टाच्या आदेशाने काढले
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेच्या पूनम गेटजवळ अतिक्रमण झाले होते. अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी काढले होते. अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले होते. अतिक्रमणधारकांनी पुन्हा अतिक्रमण करत न्यायालयाचा अवमान केला. अतिक्रमणधारकांची हायकोर्टातील याचिका फेटाळल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने १४ बेकायदा खोकी जमीनदोस्त केली.
झेडपी आंदोलन गेट जवळ मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने काही महिन्यापुर्वी अतिक्रमण मोहिम घेऊन सर्व बेकायदा खोकी काढण्याची मोहिम चालू असताना लोकप्रतिनिधी आणि नागिरकांचा विरोध झाल्यामुळे मोहिम बंद करावी लागली होती. तर काही अतिक्रमणधारक न्यायालयात गेले होते. जिल्हा न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असताना देखील पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण झाले होते. महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात काही व्यापारी हायकोर्टात जात याचिका दाखल केली होती. व्यापन्यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने तसेच न्यायालयाचा अवमान करत पुन्हा अतिक्रमण केल्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाने महापालिकेच्या अतिक्रमण पथकांने या भागात मोहिम घेत बेकायदा १४ खोकी जेसीबीच्या सहाय्याने पोलिस बंदोबस्तात काढली.
.jpg)
0 Comments