Hot Posts

6/recent/ticker-posts

हेडलाईट शौकिनांची फॅशन इतरांसाठी जीवघेणी

हेडलाईट शौकिनांची फॅशन इतरांसाठी जीवघेणी

मंगळवेढा(कटूसत्य वृत्त):- शहर व तालुक्यात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या हेडलाईट बाबत नियमांचे पालन होत नाही. यामुळे हेडलाईट शौकिनांची फॅशन इतरांसाठी जीवघेणी ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी चालकांना तीव्र प्रकाश असलेल्या डेडलाईटच्या सर्वाधिक त्रास होत आहे. अशा डेडलाईट्स दुचाकी अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सर्वत्र दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येकजण आपल्या वाहनात काहीतरी वेगळे असावे, याकडे लक्ष देत आहे. त्यात वाहनाचे मुळ हेडलाईट बदलून एलईडी लाईटचा वापर मोठ्या प्रमाणातील वापर केला जात आहे. काही शौकीन वाहन चालक बेकायदेशीरपणे चमकदार एलईडी दिवे गाडीला लावत आहेत. या एलईडी लाइटचा प्रकाश इतका तीव्र असतो की, समोरून येणाऱ्या वाहन चालकाचे डोळे दिपून जातात. प्रकाश असह्य होऊन सामान्य वाहन चालक डोळे मिटतो किंवा गाडी थेट उभी करतो.

परंतु, हेच हेडलाईट विशेषतः दुचाकी चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. रात्रीच्या अंधारात समोरून येणाऱ्या वाहनाचे पांढराशुभ्र तीव्र प्रकाश डोळ्यावर पडल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही वाहनाचे हेडलाइट संबंधित विभागाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार बसविले जातात. तथापि, काही उत्साही लोक मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्यांच्या वाहनांत एलईडी दिवे लावतात. विशेषतः कार, जीप आदी चारचाकी वाहनांवर हेडलाइटच्या शेजारी एलईडी दिवे बसविण्याची फॅशन आहे. यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी चालकांना याचा सर्वाधिक त्रास होत असून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.

मात्र, संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अशांवर कडक कारवाई केल्यास हेडलाईट बदलाचे मार्ग बंद होतील, अशी अपेक्षा जनतेत केली जात आहे.

मानांक नसलेले हेडलाईटस्

परिवहन विभागाच्या निकषानुसार वाहन उत्पादकांना हेडलाईट बनवावे लागतात. विविध चाचण्या पार केल्यानंतर कंपनीला ती हेडलाईट वापरण्याची परवानगी मिळते. वाहन उत्पादक कंपनीने बनविलेल्या वाहनात कोणताही बाह्य बदल करणे नियमबाह्य आहे. मात्र, बाजारात कार डेकोरेट्स करणाऱ्यांकडून हेडलाइट्स सहजरीत्या बदलून मिळतात. हे एलईडी दिवे कोणतेही मानक पूर्ण करीत नाहीत. ते विना चाचणी आणि विना परवानगी वापरले जात आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments