Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा दूध संघावर प्रशासक; सुनावणी पुन्हा पुढे ढकलली पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला

 जिल्हा दूध संघावर प्रशासक; सुनावणी पुन्हा पुढे ढकलली पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला


सोलापूर :  (कटुसत्य वृत्त):- जिल्हा दूध संघ तोट्यात गेल्याने दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्यासाठी पुणे येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू आहे. ती सुनावणी आता १७ फेब्रुवारीला होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असल्याने सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पुणे येथील विभागीय सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी संचालक मंडळास केला आहे. नोटिसा दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पुणे येथे बुधवारी (दि. ५) सुनावणी झाली. त्यात पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, संचालक मंडळाचे वकील जन्मजय कुर्जेकर यांनी विभागीय सहनिबंधकांना जिल्हा दूध संघावर प्रशासक नेमण्याचे अधिकार नाहीत, असा युक्तिवाद सविस्तर माहिती देण्यासाठी पुढील तारीख  गितली होती. त्यामुळे जिल्हा दूध संघाची सुनावणी पुढे गेली आहे.

दूध संघावर प्रशासक येण्याची गरज जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळांकडून राजकीय दबाव आणून दूध संघावर संचालक मंडळच ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संचालक मंडळाच्या काळात दूध संघ आणखी तोट्यात गेला. त्यामुळे दूध संघावर प्रशासक येणे अपेक्षीत आहे. मात्र, संचालकांच्या दबावापोटी जिल्हा दूध संघाची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याचा आरोप दूध उत्पादक करत आहेत.

 

Reactions

Post a Comment

0 Comments