Hot Posts

6/recent/ticker-posts

महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या भरोसा सेलमध्ये रोज तीन-चार अर्ज

 महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या भरोसा सेलमध्ये रोज तीन-चार अर्ज






सासू, सासरे त्रास देतात; नवरा मोबाईल घेऊन देत नसल्याच्या तक्रारी
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सुरक्षा विशेष कक्षाकडून भरोसा सेल स्थापन केला आहे. या कार्यालयात सासू, सासरे, दीर, नणंद त्रास देतात तर नवरा साधा मोबाईल घेऊन देत नाही. त्यामुळे मला तिथे नांदायचेच नाही, अशाप्रकारचे तक्रारी अर्ज जिल्ह्यातून रोज किमान तीन ते चार महिला-पुरुष दाखल करतात. दाखल अर्जांचा
त्याचगतीने निपटारा केला जातो.
जिल्ह्याच्या ग्रामीम भागातील विविध तालुका आणि पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महिला पल्यावर
होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत भरोसा सेलकडे अर्ज करतात. यात गंभीर कमी आणि किरकोळ तक्रारीच जास्त असतात. सासू-सासरे त्रास देतात. जास्त कामे सांगतात. यासह दीर, नणंद असे म्हणाले यासह खोट सांगून माझ्याशी लग्न करून मला फसवले अशा प्रकारच्या तक्रारी येतात. या महिलांच्या तक्रारी अर्जाचा निपटारा करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून अधिकाऱ्यांसह दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांसह अन्य महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा या भरोसा सेलमध्ये समावेश आहे. दाखल झालेल्या प्रत्येक अर्जदार महिला किंवा पुरुष या दोघांनाही येथील कार्यालयात बोलावले जाते. दोघांची बाजू ऐकली जाते. नंतर, संसार मोडल्यावर तोटे जास्त आणि फायदे कमी तर तडजोड केल्यास होणारे फायदे या दोन्ही गोष्टी पटवून सांगितल्या जातात. अशाप्रकारे दोघांचेही समुपदेशन केले जाते. दोन्ही बाजूचे जाब जबाब घेतले जातात.
या महिला अधिकारी करतात काम
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर आणि मुख्यालयाच्या पोलिस उपअधीक्षका विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलमधील पोलिस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मोहिनी भांगे,
सुमय्या तांबोळी, उमादेवी वायकुळे, अर्चना मस्के, मधु शिंदे, हदरत शेख, सुगंधा गायकवाड आणि ज्योती चव्हाण या काम करतात.
आकडे बोलतात
जानेवारी २०२४ ते आजतगायत दाखल अर्जाची संख्या : ४२३
समझोता झालेल्या अर्जाची संख्या : २७६
अर्जावरून दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्या : ४९
न्यायालयीन प्रकरणांची संख्या : ५३
प्रलंबित अर्जाची संख्या : ४५
Reactions

Post a Comment

0 Comments