Hot Posts

6/recent/ticker-posts

सहायक पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

 सहायक पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

संशयित आरोपीचे गुन्ह्यातील नाव वगळल्याचे प्रकरण
करमाळा, ता. (कटुसत्य वृत्त):- उपविभागीय अधिकारी यांच्या बनावटपत्रावरून संशयित आरोपीचे गुन्ह्यामधून नाव वगळल्याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव यांच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ डिसेंबर २०२३ ते ३० डिसेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ घडला आहे. करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाळा उपविभाग उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडील पत्रावरून तसेच ३० सप्टेंबर
२०२४ रोजीच्या सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव यांनी दिलेल्या पत्रावरून करमाळा
पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ९४६/२०२३ गुह्यांच्या तपासामध्ये तपासी अंमलदार म्हणून काम करत असताना जाधव यांनी ११ डिसेंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ रोजी या लावधीमध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी सुहास रामचंद्र साळुंखे हा गुन्ह्यातील घटनेवेळी घटनास्थळावर होता, अगर कसे याबाबत पुरेसा पुरावा निष्पन्न न करता पुण्यातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करतेवेळी आरोपी सुहास साळुंखे यांच्यावर दोषारोप न ठेवता त्यास गुह्यांच्या दोषारोपपत्रातून वगळून तपासात सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या बनावट सहीचे पत्र तयार करून गुन्ह्याचा दोषारोपपत्र क्रमांक घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय न्यायालयात दाखल केले.
सदरची बाब उघडकीस आल्यानंतर सध्या अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट
जाधव यांचे निलंबन सहायक पोलिस निरीक्षक संजय जाधव सध्या अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहेत. संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी सुहास साळुंखे यांना गळण्यात आल्याचे फिर्यादीचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने अधीक्षकांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर सहायक पोलिस निरीक्षक संजय जाधव यांनी वरिष्ठांची खोटी सही करून नाव वगळले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments