Hot Posts

6/recent/ticker-posts

राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

 राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार होत्या. प्रमुख अतिथी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, माता पालक संघाच्या मेघा खद्दे यांच्या हस्ते स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पावेल व वीरतपस्वी व तपोरत्नं यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उदघाटन करण्यात आले.या आनंद मेळाव्यात १६४ स्टॉल मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चौदा हजार रुपये नफा झाली. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व, सत्कर्म ,व्यवहार ज्ञान, ग्राहक संवाद, वस्तूंची नीटनेटकेपणा व मांडणी याविषयी स्काऊट गाईडचे पथक प्रमुख हणमंत कुरे,अमोल गुड्डेवाडी, वैशाली गुजर, सुजाता फुलारी आदींनी मार्गदर्शन केले. विनायक नगर, नीलम नगर, सिद्धेश्वर नगर, विजयनगर परिसरातील पालक बाल आनंद मेळाव्यास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भेळ, पाणीपुरी ,कचोरी, लस्सी, आईसक्रीम, सुगंधी दूध,सुशील,पोहे, ढोकळा, पावभाजी पालेभाज्या, फळभाज्या,ज्युस, स्नॅक्स,वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजन खेळ आदी विविध प्रकारचे स्टॉल मांडण्यात आले होते. आनंद मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments