Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज येथे भव्य मेकॅनिक मेळावा

 ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज येथे भव्य मेकॅनिक मेळावा 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या 35 व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून 21 फेब्रुवारी रोजी ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज येथे भव्य मेकॅनिक मेळावा व इतर अनोखी कार्यक्रमाचे आयोजन केले. आहे सदर कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता होणार असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल. या कार्यक्रमांमध्ये सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एक हजार मेकॅनिक सहभागी होणार आहेत. इथे तुम्ही ब्रँडेड कंपन्या, स्पेशल टूल्स मशिनरी, बीएस सिक्स स्टॉल इलेक्ट्रिक व्हेईकलआणि बीस सीएस सिक्स ट्रेनिंग अशा प्रकारचे विविध गोष्टी बघायला मिळतील तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण कोण बनेगा ब्रिलियंट  मेकॅनिक स्पर्धा होईल. या कार्यक्रमाची सांगता सुमधुर  शास्त्रीय संगीताने होणार आहे. तसेच या कार्यक्रमांमध्ये एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार होणार आहे.

       सदर कार्यक्रमाचे उद्घाटन हिरो मोटर कॉर्पोरेशनचे नॅशनल हेड मनीष मिश्रा, ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे  यांच्या हस्ते होणार आहे. 

        प्रमुख पाहुणे म्हणून जनरल इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर गीते,  हिरो मोटर कॉर्पे.चे संजीव कुमार, वुर्थ इंडिया लिमिटेड चे नॅशनल मॅनेजर रजीत मुलीयील, ऑटो इन्स्टिट्यूट मुंबईचे डायरेक्टर पाटणवाला हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments