Hot Posts

6/recent/ticker-posts

विवेक लिंगराज यांचे पार्थीवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार .!

 विवेक लिंगराज यांचे पार्थीवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार .!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विवेकानंद लिंगराज यांच्या पार्थीवावर मोदी स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करणेत आले. जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

सकाळी ११.३० वाजता शवविच्छेदनानंतर पार्थिव त्यांच्या  राहत्या निवासस्थानी आणण्यात आले. खासदार प्रणिती शिंदे यांनी पार्थीवाचे दर्शन घेतले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी कादर शेख, मराठा महासंघाचे शाखाध्यक्ष अविनाश गोडसे, कर्मचारी संघटनेचे पंडित भोसले, सचिन घोडके, सुधाकर माने-देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचे सह अधिकारी व कर्मचारी यांनी पार्थीवाचे दर्शन घेतले.

दुपारी साडेचार वाजता पार्थीव राहत्या घरातून मोदी स्मशानाभुमीत आणण्यात आले. वेदोक्त मंत्रोपचारात त्यांच्या पार्थीवास मुलगा अवनीश यांनी भडाग्नी दिला. या वेळी शोकसभेत दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल, मोची समाजाचे नेते व सोलापूर महानगर पालिकेचे नेते देवेंद्र भंडारी, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष बलराज मगर, बाबुराव पुजारवाड, आरोग्य कर्मचारी संघटनेचे महेश जाधव, जिल्हा परिषद पतसंस्थेचे मार्गदर्शक पंडित भोसले, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने सचिन जाधव, सरपंच संघटना व राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे वतीने अरूण खरमाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य  अरूण तोडकर, योग केंद्राचे वतीने चव्हाण, यांची श्रध्दांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, पतसंस्था २ चे गिरीश जाधव, कास्ट्राईब संघटनेचे अरुण भाऊ क्षीरसागर,  दिनेश बनसोडे , शिवानंद भरले,  विरभद्र यादवाड, जिल्हा परिषद पतसंस्थेचे चेअरमन डाॅ. एच पी माने, व्हा. चेअरमन सुरेश कुंभार, दयानंद परिचारक, मुत्तुवल्ली, चेतन वाघमारे, जिल्हा परिषद बीट पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, पत्रकार  यांचे सह सर्व संचालक मंडळ , महिला व पुरूष कर्मचारी, समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 

सिईओ कुलदीप जंगम यांनी घेतले पार्थिवाचे दर्शन..! 

काल सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वेपचार रूग्णालयात शवविच्छेदना साठी पार्थीव आणले नंतर सिईओ कुलदीप जंगम यांनी कुटूंबियाची भेट घेऊन त्यांना धीर दिला व सुखरूप घरी पोहचविले. आज पार्थीव राहत्या घरी आणलेनंतर सिईओ कुलदीप जंगम यांनी पुष्पचक्र वाहून दर्शन घेतले. कुटूंबियांना धीर देऊन सांत्वन करून लिंगराज परिवारास कुठलीही अडचण येणार नाही अशी ग्वाही दिली. लिंगराज यांचा अल्पकाळ लागलेला सहवास सिईओ कुलदीप जंगम यांचे मनाला चटका लावून गेल्याने ते भावूक झाले होते. 

१२ वी परिक्षा…. अन् लिंगराज परिवार..!

विवेक लिंगराज १२ वी परीक्षेत असताना त्यांचे वडिलांचे निधन झाले. आता विवेक लिंगराज यांचा मुलगा अवनीश बारावीची परीक्षा देत असताना विवेक लिंगराज यांचे निधन झाले. ही घटना उमेश पाटील यांनी आपल्या भावना श्रद्धांजली व्यक्त करताना बोलून दाखविले नंतर उपस्थित हजारो लोक गहिवरले.

विवेक चे जाणे मनाला यातनादायी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विवेक च्या अशा अचानक निघून जाण्याने मनाला फार यातना झालेला आहेत. इतका प्रेमळ व्यक्ती असा अचानकपणे जाऊच कसा शकतो, नियती इतकी कठोर कशी असू शकते या प्रश्नाचे उत्तर मला मिळत नाही. त्यामुळे आणखीन उदास झालो आहे ...त्यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी आम्ही सदैव प्रार्थना करू, आणि त्याने दिलेले सहकार्य, त्यांनी दिलेले प्रेम, त्याने दर्शविलेला विश्वास याबद्दल विवेक चे स्वामी परिवार सदैव ऋणी राहो. त्यांच्या जाण्याने जिल्हा परिषदेमध्ये किती पोकळीक निर्माण झाली आहे. विवेकच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना असल्याचा शोकसंदेश छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाठविला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments