लोकमंगल कृषी महाविद्यालयात पोस्टर सादरीकरण
स्पर्धा उत्साहात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे कृषी अर्थशास्त्र विभागामार्फत दिनांक १८ फेब्रुवारी रोजी आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदरील स्पर्धेचे उद्घाटन विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. अर्पिता विजापुरे हिच्या हस्ते फीत कापून व नारळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.या पोस्टर सादरीकरण स्पर्धेसाठी विद्यार्थ्याकरिता स्मार्ट शेती, अक्षय ऊर्जा स्त्रोत, कृषी मधील AI, कृषी अर्थसंकल्प २०२५, पारंपारिक शेती, महिला सबलीकरण, विविध कृषी योजना आणि वातावरण नियंत्रित शेती असे विविध कृषी संलग्नित विषय देण्यात आले होते. या सर्व विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे स्वतः लेखन व चित्रण केलेले पोस्टर तयार करून उपस्थितांची विशेष दाद मिळवली. या स्पर्धेत एकूण ७१ विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेकरिता मान्यवर परीक्षक म्हणून महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. तेजश्री लाच्यान आणि डॉ. नागार्जुन टी. एन. यांनी काम पाहिले. या स्पर्धेत समाविष्ट असलेल्या सर्व पोस्टर मधून प्रथम क्रमांक स्मार्ट फार्मिंग या विषयावर कु. संजीवनी हल्लोळी, कु. अंबिका फटाटे आणि कु. प्रियंका लोखंडे या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींच्या समूहाने पटकावला. स्पर्धेतील द्वितीय क्रमांक हा विभागून तृतीय वर्षातील मृगेंद्र घागरे दिग्विजय विधाते सुमित जाधव आणि ऋतुराज कवडे यांनी सादर केलेल्या स्टार फार्मिंग या विषयास आणि तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. नंदिनी शिंदे, कु.निहारिका फुटाणकर, कु. प्रिया मुसपेठ, कु. टी. हिंदुश्री आणि कु. वैष्णवी पाटील यांनी सादर केलेल्या महिला सबलीकरण या पोस्टरला मिळाला. स्पर्धेतील तृतीय क्रमांक हा देखील विभागून देण्यात आला.स्पर्धेतील तृतीय स्थान कृषी अर्थसंकल्प या विषयावरील तृतीय वर्षातील प्रेमराज वाघ, प्रज्वल वाघ, कानगुडे पांडुरंग, वैभव खंदारे आणि हर्षवर्धन संकपाळ या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोस्टरला मिळाले. कृषी अर्थसंकल्प या विषयावरील उत्कृष्ट पोस्टर सादर करणाऱ्या तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. प्राजक्ता व्यवहारे, कु.अर्पिता विजापुरे, कु.साक्षी येलपले आणि कु.आकांक्षा शिंदे यांनी देखील पोस्टर सादरीकरण स्पर्धेत तृतीय स्थान मिळवले. या स्पर्धेच्या आयोजन व यशस्वीतेसाठी कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नवनाथ गोसावी, प्रा. सुकन्या जाधव, प्रा. स्वाती खोबरे यांनी परिश्रम घेतले. सदरील पोस्टर सादरीकरण स्पर्धेच्या आयोजनासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे अमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट पोस्टर बद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे पोस्टर भेटी व चर्चेदरम्यान विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

0 Comments