भीमा सहकारी साखरकारखान्यावर कामगार संघटनेचे धरणे आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 28, 2025

भीमा सहकारी साखरकारखान्यावर कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

 भीमा सहकारी साखरकारखान्यावर कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

मोहोळ(कटूसत्य वृत्त):- भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर ता. मोहोळ हा कारखाना मल्टीस्टेट च्या यादीत आला असून या कारखान्याच्या कायम व हंगामी कामगारांना ब्रेक देऊन बाहेरील कामगारांच्या मुलाखती न घेता कंत्राटी पद्धतीवर त्यांना रुजू करून घेतल्याने, कामगारावर होणारी उपासमारी टाळण्यासाठी तसेच मागील पाच वर्षाचा प्रॉव्हिडंट फंड, ३० महिन्याचा पगार व हंगामी कामगारांचा बेकार भत्ता आदी देणी मिळावी. यासाठी भीमा सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीने कारखान्याच्या गेटवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथे कारखाना गेट समोर कामगार संघटना युनियन व सर्व कामगार तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे २०१८ पासून फायनल पेमेंट व पाच वर्षाचा प्रॉव्हिडंट फंड व तीस महिन्याचा थकित पगार दिलेला नाही.  २०२३ २४ मध्ये जिल्हाधिकारी यांचेसमोर थकीत पगार व प्रॉव्हिडंट फंड व फायनल पेमेंट हे सर्व जून २०२४ पर्यंतचा सर्व पगार थकीत पगार देणार असे कारखान्याच्या व्यवस्थापनाने लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी यांचे समोर झालेल्या बैठकीत लिहून दिले होते. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कारवाई न करता बाहेरील कंत्राटी कामगाराकडून कारखान्यातील कामे करून घेतली जात आहेत. आणि कायम कामगारांना घरी बसविले आहे. या कंत्राटी कामगारांना थांबवून कायम कामगाराला काम देण्यात यावे. आणि थकीत पगार व कामगारांची इतर देणी द्यावी. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील असे कामगार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी अध्यक्ष दिलीप डोंगरे, हनुमंत चव्हाण, संजय चव्हाण, विष्णू वाघमोडे, रमेश काळे, सुरेश डोंगरे आदींसह सर्व कामगार निवृत्त कामगार उपस्थित होते.

कायम कामगारांना ब्रेक दिल्याचे परिपत्रक
कारखान्यातील सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख यांना कळविण्यात येते की, सध्या सन २०२४-२५ चा गळीत हंगाम बंद झाला असल्याने इंजीनियरिंग व उत्पादन विभागातील सोबतच्या यादीतील कर्मचारी कामावर ठेवण्यात येत असून उर्वरित कायम व हंगामी सेवेतील कर्मचाऱ्यांना दिनांक १२/०२/२०२५ रोजी च्या ऑफिस वेळेपासून ब्रेक देण्यात येत आहे...... कार्यकारी संचालक

भीमा सहकारी मल्टीस्टेट, आर. बी. टेक कंपनी कडून कामगार भरती
भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर हा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात कार्यरत असणारा कारखाना आत्ता १६६ सभासदांचा राहिला असून १६/१२/२०२४ रोजी सदर सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट च्या लिस्ट मध्ये दिसून येत आहे. तर आर. बी.टेक नावाच्या कंपनी साखर कारखान्याला कंत्राटी कामगार पुरवीत आहे. आणि कारखाण्याच्या कायम व हंगामी सेवेतील कामगारांना सक्तीचा ब्रेक दिला आहे. हा कामगारांवरील अन्याय बंद करावा.
कामगार संघटना

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages