Hot Posts

6/recent/ticker-posts

सपाटेंच्या दानामुळेच सांस्कृतिक भवन साकार

 सपाटेंच्या दानामुळेच सांस्कृतिक भवन साकार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माजी महापौर मनोहर सपाटे आणि माझा परिचय तसा जुनाच आहे. संस्थाचालक म्हणून त्यांच्या सहवासात राहण्याचा मला योग आला. अध्यक्ष सपाटे हे जसे कर्तृत्वान तसे ते दानशूर देखील आहेत. याचा प्रत्यय मला त्यांनी मराठा मंदिर मुंबई यांच्यकडून हरिभाई प्रशालेच्या मागे मिळालेली वसतिगृहाची जागा सपाटे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली होती. परंतु त्यांनी ती वैयक्तिक न ठेवता समाजासाठी म्हणून दान दिली. आज त्याच वास्तुत त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि नावाने सुध्दा मनोहर सपाटे सांस्कृतिक भवन अर्थात मंगल कार्यालय उभारले. त्यामुळे त्यांचे मोठेपण अवर्णनीय आहे. आज या जागेची किंमत ५० कोंटीच्या घरात असेल. परंतु सपाटे यांनी समाजासाठी आणि समाजातील मुलांसाठी त्यावर पाणी सोडून त्याला सार्वजनिक रुप दिले. यातच त्यांचे मोठेपणा दिसून येते. अर्थातच या कामी त्यांना या संस्थेत काम करणारे त्यावेळेचे कै. चंद्रकांत येवले, मधुकर लोंढे, माजी प्राचार्य डॉ. अनिल बारबोले, प्राचार्य डॉ. मधुकर पवार, मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, दीपक डुरे-पाटील, प्रा. संतोष गवळी, दत्ता सुतार, राजु कसबे यासारखे प्रामाणिक कर्मचारी यांचीही साथ तेवढीच मोलाची ठरली. त्यामुळेच आज ही देखणी वास्तु उभी आहे. तिला देण्यात आलेले नावही इमारतीला साजेशे  असेच आहे. सपाटे हे आज वयाची ७४री साजरी करीत आहे ते शंभरी पार करोत. १९९३ साली सपाटे यांनी छत्रपती शिवाजी प्रशालेच्या इमारतीतील जागा कमी पडू लागल्याने व्यवसायीक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र विभाग म्हणून याच मराठा मंदिर येथे स्थलांतरीत करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्यामुळेच संस्थेला हे वैभव पाहायला मिळत आहे. प्रा. महेश माने यांची त्यांना मिळणारी साथही महत्वाची आहेत. त्यामुळेच आज आमची संस्था चौफेर प्रगती करीत आहे. सपाटे यांना आजच्या शुभदिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना परमेश्वराने दीर्घायुष्य द्यावे, ही प्रार्थना करतो.                                                                                       
दत्ता भोसले                                                                            
अध्यक्ष, कॉलेज कर्मचारी युनियन सोलपूर जिल्हा 


Reactions

Post a Comment

0 Comments