छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अश्वारूढ पुतळा घरावर बसवून साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 27, 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अश्वारूढ पुतळा घरावर बसवून साजरी

 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 

अश्वारूढ पुतळा घरावर बसवून साजरी

मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मोहोळ येथील शेतकरी कुटूंबात जन्माला आलेले डॉ. कौशिक संदीपान गायकवाड यांनी स्वतःच्या घरावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करून शिवजयंती साजरी केली आहे. या आदर्शवत संकल्पनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होणारे, व्यवसायिक व उदयोजकांना पत व प्रोत्साहन देणारे डॉ.कौशिक गायकवाड यांचं महाराजांबद्दल असणारं प्रेम यातून व्यक्त झालं आहे. पुतळा उभारल्यापासून त्यांची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. तसेच पुतळा पाहण्यासाठी मोहोळ तालुक्यातील अनेक शिवप्रेमी डॉ. कौशिक संदीपान गायकवाड यांच्या घराला भेट देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. मोहोळ येथील डॉ. कौशिक गायकवाड स्वातंत्र्यसेनानी संदीपान गायकवाड यांचे चिरंजीव आहेत. याबाबत त्यांना विचारले असता छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य महान असून ते कधीही विसरणारे नाही. आज आम्ही जे घडलो ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच त्यांना कोणीही विसरू शकत नाही. माझ्या वडिलांची इच्छ होती, की आपण महाराजांचा पुतळा उभा केला पाहीजे. महाराजांच्या आठवणी कधीही विसरू शकत नाही त्यामुळे हा पुतळा उभा केला आहे असं डॉ.कौशिक संदीपान गायकवाड यांनी सांगितलं.

अनेक देशासह महाराष्ट्रात नुकतीच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीदिवशी अनेक चांगले उपक्रम अनेक देशासह महाराष्ट्रात राबिवण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घरावर उभा करून शिवजयंती साजरी करताना डॉ.कौशिक संदीपान गायकवाड, त्यांच्या पत्नी सौ. वंदना कौशिक गायकवाड, चिरंजीव राजवीर, रुद्रवीर, बंधू अशोक, सुरेश, सौ. विजया यांचे हस्ते पूजा व आरती करणेत आली.त्यावेळी उद्योगपती वैभव गुंड, विजय कोकाटे, प्रतिक गायकवाड, सज्जनराव पाटील, प्रवीण डोके, मोहोन होनमाने, उत्तरेश्वर अतकरे, राजेश खपाले, राकेश देशमाने, राजशेखर गायकवाड, सौ. शुभांगी माने, श्रीनिवास माने, भाऊसाहेब गायकवाड, शैलेश गावडे, शुभम माने, सैफअली कुरुलकर, अक्षय डोंगरे, अनिल तेली, देवानंद सुतार, रघुनाथ भोसले, विक्रम गुंड, मुस्ताक शेख, बाळासाहेब शिंगाडे, हरिभाऊ कोरे, हरिभाऊ माली, विजय गरड, जयसिंह देशमुख, मोहन माळी, नितीन टेळे, विष्णू थिटे, भारत बोबडे, नागेश खांडेकर, सुरेश घाटगे, सुनील साठे, नितीन गुंड, रमजान पटेल, जैनुद्दीन तांबोली इ. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages