पिलीव येथे वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 27, 2025

पिलीव येथे वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पिलीव येथे वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पिलीव (कटूसत्य वृत्त):-माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील मच्छीद्र मामा खुर्द वाचनालयात मच्छीद्र मामा खुर्द यांची ८४ वी जयंती व वाचनालयाचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते मच्छीद्र मामा खुर्द यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच दीपप्रज्वलन करणयात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य संतोषकुमार शेंडगे, अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक जगदीश गोडसे उपस्थित होते. सुरुवातीला वाचनालयाचे अध्यक्ष प्रा सदाशिव शिंदे यांनी प्रास्ताविक करीत वाचनालयाच्या स्थापनेपासुनची आजपर्यंतचा प्रगतीचा आलेख मांडला. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, माळशिरस ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विलास कदम, सुळेवाडी येथील विठ्ठल दयाजी विदयालयाच्या मुख्याध्यापक आश्वीनी शेंडगे, पत्रकार संजय पाटील यांना ग्रंथमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बचेरी येथील योजना काटे हिची महसूल सहहयाक पदी निवड झाल्याबद्दल, काजल कोकरे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल, प्रियांका बरकडे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तसेच बचेरी येथील पहिलि ते चौथीपर्यंतच्या विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विदयार्थीनचा सत्कार करणयात आला. यावेळी प्रम ख पाहुणे व पुरस्काराथि यांनी वाचनालया मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सदगुरु साखर कारखान्याचे पिसे, पवार, शशिकांत मोरे, बिभिषण शिकारे, बाबा गोरड, बबन शिंदे, संभाजी कोकरे, नारायण शिंदे, सोनालि गोरड, संगिता शिंदे, अक्षय शिंदे, सागर शिंदे, विजय म दने, सौरभ शिंदे, ओम शिंदे, समर्थ शिंदे, चैतन्य शिंदे, वैभव शिंदे व ग्रामस्थ, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन समर्थ शिंदे यांनी केले तर आभार अस्मिता शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages