Hot Posts

6/recent/ticker-posts

धसांनी अचानक युटर्न का घेतला? बावनकुळेंच्या बंगल्यावर नेमकं काय घडलं?

 धसांनी अचानक युटर्न का घेतला? 

बावनकुळेंच्या बंगल्यावर नेमकं काय घडलं? 

बीड (कटूसत्य वृत्त):- बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेला दोन महिने झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.

राजकीय वर्तुळात देखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात सुरूवातीपासूनच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दमानिया यांच्यासोबतच भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील चांगलेच आक्रमक आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मात्र आता अंजली दमानिया यांनी सुरेश धस यांच्यावरच आरोप केले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया? 

‘सुरेश धस यांची जी भूमिका आहे ती अचानक कशी काय बदलली हा माझा त्यांना प्रश्न आहे अचानक ते युटर्न घेताना पाहायला मिळतात अशा पद्धतीने सुरेश धसांनी विधान करणे हे संकेतांना धरून नाहीये , मला तर माझ्या खात्रीलायक सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली होती आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे. त्यांना त्यांची भूमिका बदलायला किंवा सौम्य करण्यास सांगण्यात आलेलं आहे, आणि हेच कारण आहे की त्यांची वक्तव्य सुद्धा आता बदलत चालली आहेत,’ असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केला आहे.दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता, पण हा राजीनामा होऊ शकला नाही. कारण कुठेतरी फडणवीस त्यांना वाचवतायेत असं आता स्पष्ट दिसू लागलेलं आहे, असा आरोप देखील यावेळी दमानिया यांनी केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आणखी मोठे खुलासे या संदर्भात करणार आहे आणि त्यानंतर नेमकं चित्र काय आहे ते देखील स्पष्ट होईल. या विरोधात आम्ही आता ठोस कारवाई करण्याच्या तयारीला लागलो आहोत. दोन ते तीन दिवसांमध्ये एक मोठा घोटाळा बाहेर पडणार आहे, असा इशाराही यावेळी दमानिया यांनी दिला आहे.

पकंजा मुंडेंना टोला 

पंकजाताई मुंडे या जर म्हणत असतील की मुंडेंचे समर्थक एकवटले की एक पक्ष तयार होईल तर मग माझा त्यांना प्रश्न आहे की त्या भाजप सोडणार आहेत का? विधान परिषद सोडणार का? आणि मंत्रीपदही सोडणार का? तेव्हा जाऊनच त्यांना ओबीसींचा नवीन पक्ष काढता येईल, असा टोलाही यावेळी दमानिया यांनी लगावला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments