Hot Posts

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने केला विद्यार्थ्यांचा व जेष्ठांचा सन्मान

 उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त

 शिवसेनेने केला विद्यार्थ्यांचा व जेष्ठांचा सन्मान 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त युवासेना शहरप्रमुख समर्थ दादा मोटे यांच्या वतीने शिवसेना युवासेना आयोजित पूर्व परीक्षेतील एसएससी विद्यार्थ्यांचा सन्मान व बक्षीस वितरण व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या अध्यक्षेखाली तर जिल्हाप्रमुख अमोल  शिंदे, मनोज  शेजवाल, बालयोगी अविनाश महाराज, उमेश गायकवाड, हरिभाऊ चौगुले, तुकाराम नाना मस्के, सोमेश क्षीरसागर, मुन्ना साठे, संजय सरवदे, नवनाथ चव्हाण, सुजीत खुर्द, सुनील निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, याप्रसंगी शहर परिसरातील असंख्य जेष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी जेष्ठ महिलांनी व नागरिकांनी उपस्थित राहून  एकनाथ शिंदेना दीर्घाविष्य लाभो अश्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख तथा भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड चे चेअरमन  शिवाजीराव सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना नामदार एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य लोकांच्या कष्टाचे निवारण करण्यात घालवले महिलांसाठी लाडकी बहीण योजना तसेच युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी प्रचंड प्रयत्न केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रभागी यावेळी माननीय शिवाजीराव सावं त यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप टॅब देण्यात आला तसेच ६१ कॉमन मॅन यांना शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी जयश्रीताई पवार, योगेश जाधव, अशोक चौन्डे, पूजाताई चव्हाण, सुनंदाताई साळुंके, मनीषाताई नलावडे, मारताताई असादे, शशिकलाताई कस्पटे, अनिताताई गवळी, अश्विनीताई भोसले, प्रमोद चिकणे, त्रिगुण पवार, स्वप्नील खरात, संमेत सावळे, बालाजी नायकोडे. सचिन कदम, यांच्यासह सर्व पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments