पिंपरी दुमाला चा साहिल चिखले मुंबई पोलीस दलात
: अखेर संघर्ष संपला!
शिरूर (कटूसत्य वृत्त):-पिंपरी दुमाला तालुका शिरूर येथील शेतकरी कुटुंबातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या आई वडिलांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या अलौकिक कर्तुत्वाचा ठसा उमटवून कुमार साहिल ललिता सोमनाथ चिखले या युवकाने आपली माती क्रीडा प्रबोधनी मधून संघर्षाचा पाया रचला आणि खो खो हा खेळ राष्ट्रीय पातळी वर खेळून अनेक सन्मान मिळवले आणि कालच खो-खो या खेळाच्या माध्यमातून मुंबई पोलीस हवालदार या पदावर नियुक्ती झाल्याने साहिल व त्याचे आई-वडील कुटुंबीय नातेवाईक ग्रामस्थ यांना आनंदाला पारावारा उरला नाही या बातमीने आई आणि वडिलांचे आनंदाश्रू अनावर झाले. पुत्र व्हावा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा या संत तुकाराम महाराजांच्या वाणीने प्रसिद्ध असणाऱ्या ओवीने साहिलचे झालेली निवड खरोखरच सर्वांना प्रेरणा देणारी आहे. साहिल चिखले चा प्रवास अतिशय थक्क करणार आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई या शहरातून गावाकडे आपली शेती सांभाळण्यासाठी आलेले चिखले दापत्यानी आपल्या काळया आईची सेवा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना अनेक कौटुंबिक अडीअडचणीचा सामना करून आपला प्रपंच केला वेळप्रसंगी मिळेल तिथे काम करून आपल्या दोन्ही मुलांना मोठा मुलगा अनिकेत व लहाना मुलगा साहिल यांना गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाचे धडे दिले त्यानंतरचे शिक्षण वाघाळे येथील रयत शिक्षण संस्थेचे कालिका माता विद्यालय वाघाळे या ठिकाणी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले तिथे त्यांना खो-खो चे प्रशिक्षक धीरज दंडवते सर यांचे खो-खो या खेळाबद्दल चे मार्गदर्शन लाभले त्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी शालेय खो-खो स्पर्धा त्यानंतर तालुका पातळीवरील तसेच जिल्हा पातळीवरील खो खो खेळाची चमक दाखवल्यानंतर अनिकेत आणि साहिल यांची राज्याच्या खोखो स्पर्धेमध्ये निवड झाली त्याही ठिकाणी त्यांनी आपल्या मेहनतीच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक पदके मिळवली हे सर्व होत असताना त्यांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना कोणतीही कमी पडू नये म्हणून कशाचीही परवा न करता मिळेल ते काम करून अहोरात्र कष्ट केले व आपल्या मुलांना आर्थिक मदत करत राहिले अनेक वेळा आर्थिक अडचणीचा सामना त्यांना करावा लागला हा सामना करत असताना आपल्या कुटुंबामध्ये स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन आपल्या मुलांना कोणतीही उणीव भासू दिली नाही. याची जाण ठेवून अनिकेत आणि साहिल यांनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले अखेर साहिलला या प्रयत्नात यश आले येणाऱ्या भविष्यकाळात लवकरच अनिकेत पण लवकरच उंच भरारी घेऊन शासकीय पदावर जाण्याची त्याची पुरेपूर इच्छा आहे जशी साहिलने आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण केली तशीच इच्छा येणाऱ्या काळात अनिकेत पण पूर्ण करणार असल्याचा मानस त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या निवडीने पिंपरी दुमाला व परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
0 Comments