बालभारती विद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 19, 2025

बालभारती विद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 बालभारती विद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-कुमठा नाका परिसरात असलेल्या सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती विद्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष   शब्बीर शेख सर उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ अख्तरबानो शेख मॅडम,विद्यालयाचे मुख्याध्यापक हाजी रिजवान शेख माध्यमिक विभागाचे प्राचार्य  इम्तियाज मुल्ला सर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमापूजनाने झाली.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आदर व्यक्त केला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मा जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून उपस्थित मान्यवरांना आपल्याकडे आकर्षित केले. शिक्षक मनोगतातून इनामदार सर यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून शिवरायांची राजनीती व युद्धनीती याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिस सर यांनी तर आभार  रिजवान शेख सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages