महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचे आराध्य दैवत
सोमेश्वर देवस्थानचे येत्या 21 तारखेला कलशारोहण सोहळा
शिरूर (कटूसत्य वृत्त):- शिरूर तालुक्यातील पाच पांडवकालीन स्थापित पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर देवस्थानचे कलशरोहन सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्यानिमित्त शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या सर्व कार्यक्रमास गावातील सर्व माहेरवासीन कुटुंबीय मित्रपरिवार व सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवावी व सोमेश्वर महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट व पिंपरी दुमाला ग्रामस्थ यांनी केले आहे या कलशारोहण सोहळ्यासाठी कलश सौजन्य बबनराव तु कुटे (मा अध्यक्ष महागणपती देवस्थान ट्रस्ट) व प्रकाश शेठ मो लांडे(मा चेअरमन रांजणगाव गणपती तसेच पिंपरी दुमालातील माहेरवासनी यांचे सहकार्य लाभले आहे
कलशारोहण सोहळ्यानिमित्त दिनांक 21 रोजी पहाटे 4.30 वाजता पुजा मातृका पूजन होम हवन इत्यादी 9.30 वाजेपर्यंत विधी संपन्न होणार आहे
त्यानंतर सकाळी 10 वाजता तमाम शिवभक्त व सर्व ग्रामस्थ पाहुणेमंडळी यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कलश मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे हा सोहळा दुपारी 12 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे दुपारी बारानंतर सर्व शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कालावधीमध्ये मान्यवर देणगीदार यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिर साठी फुलांचे आकर्षक सजावट ह भ प नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांचे सौजन्य लाभणार आहे या कलशारोहन सोहळा साठी ह भ प नंदकिशोर दादा महाराज आळंदी हे उपस्थित राहणार असून महाराजांच्या हस्ते कलशारोहण बसवण्यात येणार आहे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संतोष महाराज कौठाळे यांचे कीर्तन सेवा लाभणार आहे
0 Comments