Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने प्रबोधन यात्रा 2025

 जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने प्रबोधन यात्रा 2025

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यांचा दिनाच्या निमित्ताने अहिल्यानगर येथील आरंभ फाउंडेशन आणि प्रयास फाउंडेशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर प्रबोधन यात्रा 2025 च्या आयोजन करण्यात आले आहे हे या प्रबोधन यात्रेचे सातवे वर्ष आहे . यावर्षी या यात्रेचा प्रवास दिनांक 3 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यानअहिल्यानगर कुर्डूवाडी सोलापूर पंढरपूर सांगली कोल्हापूर आणि सातारा असा असणार आहेअहिल्यानगर ते सातारा असा या प्रबोधन यात्रेचा प्रवास असणार आहे. कॅन्सर प्रबोधन यात्रा 2025 च्या आयोजनामध्ये 4 फेब्रुवारी 2025 रोजी ही यात्रा सोलापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे सोलापूर येथील युगंधर फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने सोलापूर येथील कॅन्सर जनजागृती अभियान तसेच महिला आरोग्य शिबिर यांच्या आयोजन वेळ करण्यात येते. उद्या म्हणजे 4 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचा दिनाच्या निमित्ताने फाउंडेशन सोलापूर आणि इतर सहकारी संस्था यांच्या वतीने सोलापूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सकाळी आठ वाजता संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथे कॅन्सर जनजागृती रॅलीचे आयोजन त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता कॅन्सरला पूरक असणाऱ्या कागदी चहाच्या कपाला बंदी आणण्यासाठी  जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे यानंतर दयानंद कॉलेज सोलापूर येथे कॅन्सर विषय आयोजित करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये सोलापूर शहरातील बॉर्डर हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी कॅन्सर विषयक जाणीव जागृती व्याख्यान तसेच सोलापूर शहर लगत असणाऱ्या कारंबा गावात महिलांसाठी त्यांचा जागृती व्याख्यान आणि महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आल्याची माहिती युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्ष प्राध्यापक रेश्मा माने यांनी दिली. कॅन्सर प्रबोधन यात्रेमध्ये सोलापूर मधील विविध सामाजिक संस्था शाळा महाविद्यालय यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन कॅन्सर विरुद्ध लढा देण्यासाठी एकत्र येण्याचे आव्हान करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments