टेंभुर्णी येथे नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने गणेश जयंती उत्साहात साजरी...
टेंभूर्णी(कटूसत्य वृत्त):- शनिवार दिनांक 01/02/2025 रोजी टेंभूर्णी महादेव गल्ली येथील नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने श्री नरसिंह गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली करण्यात आली
गणेश जयंती चे महत्व म्हणजे या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होता असे आध्यात्मिकता सांगत असल्याने सालाबाद प्रमाणे या ही वर्षी मोठ्या उत्साहाने गणेश जयंती दुपारी बारा वाजता साजरी करण्यात आली
यावेळी श्री मंगलमूर्ती महिला भजनी मंडळ वाघोली, जय तुळजाभवानी महिला भजनी मंडळ, टेंभुर्णी. श्रीराम महिला भजनी मंडळ टेंभुर्णी यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर, संजय शेठ कोठारी यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीला अभिषेक करण्यात आला. उपस्थित गणेश भक्तांनी फुलांची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोषात गणेश जन्मोत्सव साजरा केला. नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदाते व कोठारी ज्वेलर्स चे मालक संजय कोठारी यांना गणेशाची प्रतिमा भेट देऊन पो. गणेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे सभापती विक्रम दादा शिंदे, भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, राष्ट्रवादी युवक चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब देशमुख टेंभुर्णी ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष औदुंबर भाऊ देशमुख, डॉ. गंभीरे, ॲड ,रितेश बोबडे, ग्रा. पं. सचिन होदाडे, ऋषिकेश बोबडे, सोमनाथ ताबे तसे नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व महिला मंडळ उपस्थित होते
गणेश जयंती निमित्त दिवसभर महाप्रसादाचे वाटप चालू होते. दिवसभर महाप्रसाद वाटण्यासाठी महादेव गल्ली येथील नरसिंह मित्र मंडळाच्या वतीने सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले
0 Comments