Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर-देहू दरम्यान रेल्वे सुरू करण्याची मागणी

 पंढरपूर-देहू दरम्यान रेल्वे सुरू करण्याची मागणी



 
"खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत केली मागणी"

अकलूज (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे, देहू आणि पंढरपूर रेल्वेमार्गावर रेल्वे सुरू  केल्याची मागणी केली. महाराष्ट्रभरातील लाखो वारकरी भक्तांसाठी पंढरपूर देहू रेल्वे सुविधायुक्त ठरेल असे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच देहू येथील संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, तसेच आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी राज्यभरातील लाखो भक्तांचे प्रमुख तीर्थस्थळे आहेत.सध्याच्या परिस्थितीत, देहू आणि पंढरपूर दरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे भक्तांना आणि सामान्य प्रवाशांना अडचणी येत आहेत. खा.मोहिते-पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाकडे त्वरित रेल्वे सेवा सुरू करण्याची विनंती खा.मोहिते-पाटील यांनी केली.  

याचबरोबर दादर-पंढरपूर  सांगोला-मिरजमार्गे सातारा ही एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालते प्रवाशांच्या सोईकरता ही रेल्वे दररोज नियमित करण्यात यावी.
कुर्डुवाडी जंक्शनवर पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला थांब्याची मागणी केली आहे.तर हुतात्मा व उद्यान एक्सप्रेसला माढा व जेऊर येथे थांबा देण्याची मागणी केली.
 
मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस ही कोरोना काळानंतर संपूर्णपणे एसी कोचमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. सध्या या गाडीत २ स्लीपर कोच आणि २ जनरल कोच उपलब्ध आहेत.मुंबई ते हैदराबाद दरम्यानच्या अन्य स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना कोचच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, या गाडीमध्ये अतिरिक्त २ स्लीपर आणि २ जनरल कोच जोडण्यात यावे म्हणून सांगतिले.

खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदारसंघातील विविध रेल्वे प्रश्न केंद्रीय रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमक्ष मांडले यावर मंत्री महोदयांनी  संबंधित मागण्या मार्गी लावण्या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
Reactions

Post a Comment

0 Comments