Hot Posts

6/recent/ticker-posts

मंद्रूपची मळसिध्द केसरी बरोबरीत शंभरावर पार पडल्या कुस्त्या...

 मंद्रूपची मळसिध्द केसरी बरोबरीत

शंभरावर पार पडल्या कुस्त्या...


मंद्रूप  (कटूसत्य वृत्त):-अतिशय अटीतटीची व रोमहर्षक होऊनही गणेश जगताप व विशाल भोंडू यांच्यातील दोन‌ लाख एक हजार व चांदीचे गदा आणि कडा असणारी मानाची अंतिम श्री.मळसिध्द केसरी कुस्ती पाऊण तासाच्या झटापटीनंतर अखेर बरोबरीत सुटली.या दोघांना विभागून बक्षीसे देण्यात आले. येथील  मळसिद्धप्पा-शेखासाहेब कुस्ती आखाड्यात माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कुस्ती मैदानाचे पूजन आरकेरीचे मठाधिपती श्री.औदुसिध्द महाराज, गदगी महाराया ओगसिध्द पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.फडाचे अध्यक्षस्थानी एडवोकेट राजेश देशमुख होते.

यावेळी व्यासपीठावर हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील,माजी सभापती अप्पाराव कोरे, श्रीशैल हत्तुरे, अर्जुनराव टेळे, सुरेश पाटील, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत देशमुख, जगन्नाथ म्हेत्रे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,प्राचार्य बसवराज कुमठेकर, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी,रमेश नवले, संदीप मेंडगुदले, संतोष बरूरे, अण्णप्पा सतूबर,सतीश वेर्णेकर, प्रशांत कडते, सिध्दलिंग म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे, शिवानंद लोभे, अप्पासाहेब शिळ्ळे, शिवपुत्र जोडमोटे, सचिन फडतरे आदी उपस्थित होते.

अंतिम कुस्ती येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आणि माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे यांच्या ग्रुपतर्फे दोन लाख एक हजार रूपयांची तसेच सतीश वेर्णेकरकडून चांदीची गदा,दोन चाॅदीचा कडा इनाम असलेली कुस्ती  हरियाणा केसरी विशाल भोंडू विरुद्ध‌ महाराष्ट्र उपकेसरी विजेता पुणे येथील गणेश जगताप यांच्यात झाली.

यावेळी   दोन्ही पैलवानांनी एकमेकांवर एकेरीपट,मोळी,पोकळघिस्सा,धोबीपछाड या आदीं डावाचा वापर केला.मात्र दोघेजण या डावात तरजेब असल्याने अखेर दोघांतली कुस्ती बरोबरीत सुटली.मंद्रूपचा बबलू व्हनमाने विरुद्ध मोहोळचा सोहेल शेख यांच्यात रंगलेल्या कुस्तीत व्हनमाने हा विजयी झाला.मंद्रूपचा शुभम कारंजे यांनेही प्रतिस्पर्धेच्या पैलवानवर रोमहर्षक विजय मिळविला.यावेळी शंभराहून अधिक कुस्ती संपन्न झाले.माजी सरपंच पिराप्पा म्हेत्रे वागेश म्हेत्रे,रवी म्हेत्रे,सोमनिंग टेळे,सादिक अत्तार,लक्ष्मण कोळी, रंगनाथ राठोड, बबन्ना व्हनमाने, श्रीमंत रुपनर,काशिनाथ जेऊरकर,शंकर म्हेत्रे, नागू म्हेत्रे ,ओंकार म्हेत्रे मलकारसिध्द म्हेत्रे, सोमशंकर म्हेत्रे, सतीश मेंडगुदले, भीमा मायनाळे आदींनी कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

  या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील  पैलवान मोठया संख्येने  सहभागी झाले होते.या  कुस्त्या माजी सभापती  गुरुसिध्द म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्या. कुस्तीचे समालोचन अशोक बनसोडे व धनाजी मदने यांनी केले तर आभार माजी सरपंच तथा कुस्तीचे संयोजक पिराप्पा म्हेत्रे यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments