माऊली शिक्षण संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचलित लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज टेंभुर्णी यांचे वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील पत्रकार दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी व परिसरातील तमाम पत्रकार बांधवांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ पत्रकार टेंभुर्णी प्रेस क्लबचे सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच टेंभुर्णी ग्रामीण व टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकार संघाचे आजी- माजी पदाधिकारी व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी धनंजय मोरे,हरिश्चंद्र गाडेकर व डी.एस. गायकवाड सर या पत्रकार बांधवांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांकडे देखील येण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले तसेच संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे बोलतांनी म्हणाले की,खऱ्या अर्थाने कोणतेही गोष्टीला योग्य तो न्याय देण्याचं काम पत्रकार करीत असतात. कोणत्याही घटनेच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेत समाजापर्यंत ती वास्तवता आणण्याचे काम देखील पत्रकार बांधव करीत असतात. प्रशालेमध्ये साजरा होणाऱ्या विविध उपक्रमांच्या जेव्हा बातम्या पत्रकार बांधव वृत्तपत्रामध्ये देतात तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये देखील एक प्रकारचा वेगळा हुरूप पाहायला मिळतो.
सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे,सचिव सुरजा बोबडे,शै.संचालक मंगेश काशीद, सनराइज् स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.शाहिदा पठाण, लक्ष्मी-आनंदचे प्राचार्य विकास करळे,जनसंपर्क अधिकारी सागर खुळे,डी.एस.गायकवाड, सदाशिव अण्णा पवार, टेंभुर्णी प्रेस क्लब,टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक्स मिडिया सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का सरडे,प्रस्ताविक अडाणे मॅडम, विशेष माहिती वजाळे सर तर आभार प्रीतम मडके यांनी मांडले.
0 Comments