पारस मध्ये 14 किलो गांजा देशी पिस्तूल सह आरोपीस अटक......! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 17, 2025

पारस मध्ये 14 किलो गांजा देशी पिस्तूल सह आरोपीस अटक......!

 पारस मध्ये 14 किलो गांजा देशी पिस्तूल सह आरोपीस अटक......!   


अकोला (कटूसत्य वृत्त):-बाळापुर तालुक्यात 16 जानेवारी रोजी बाळापूर पोलिसांनी धाड टाकून एका घराची झडती घेतली असता . या घरातून देशी बनावटीचे पिस्तूल व 14 किलो गांजा असा चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सूत्राकडून ठाणेदार अनेक जुमडे यांनी  गोपनीय माहितीच्या आधारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने पारस येथील रहिवासी अंकित प्रकाश इंदोरे (वय 22 ) याच्या घराची झडती घेतली असता. त्याच्याकडे एक देशी पिस्तूल एक राऊंड आधी 14 किलो गांजा सापडला. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस कर्मचारी महिला अधिकारी व कर्मचारी तातडीने बोलवून संपूर्ण घराची झडती घेतली. व  अंकित इंदोरे याला अटक केली ‌..

बाळापुरात अवैध धंद्यांना उत आला असून ‌.  जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध प्रतिबंधित गुटखा पान मसाला,   प्रतिबंधित गोमा मास विक्री, यांना आळा घालवा अशी जनसामान्य नागरिकातून मागणी होत आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages