जिल्ह्यातील २८९ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत मिळणार प्रवेश
सोलापूर (कटुसत्य वृत्त):-
शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) दुर्बल वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातून स्वयंअर्थसाहित ३०० शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात
आल्या होत्या. यापैकी २८९ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या नोंदणी केलेल्या शाळांतच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येणार
प्रवेशासाठी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात ४८९ स्वयंअर्थसाहित शाळा आहेत. यात १८९ शाळा अल्पसंख्याक दर्जाच्या आहेत. यातील ३०० शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आल्या होत्या. पात्र असणाऱ्या शाळांपैकी २८९ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. शाळा नोंदणीसाठी १८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत
ऑनलाइन प्रक्रिया पार पडली. नोंदणीनंतर शाळा पडताळणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित शाळांनी पडताळणी करताना बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित झालेल्या शाळांबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या आहेत.
0 Comments