Hot Posts

6/recent/ticker-posts

न्यायासाठी पोराबाळांसह माऊली बीडहून मुंबईत, फडणवीसांची घेतली भेट

 न्यायासाठी पोराबाळांसह माऊली बीडहून मुंबईत, फडणवीसांची घेतली भेट



 फडणवीस म्हणाले, कुणालाच सोडणार नाही
मुंबई (कटूसत्य वृत्त):- सरपंच हत्याप्रकरणावरुन मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. कठोर कारवाई होणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
तसेच कुटुंब म्हणेल त्याच अधिकाऱ्यांना SIT मध्ये घेणार असे देखील मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना आश्वासीत केले आहे.
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, भाऊ धनंजय देशमुख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संतोष देशमुखांची आई, पत्नी, मुलगी, मुलगा उपस्थित होते. यावेळी भाजप आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित होते.बीडमधील गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही. तसेच कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांनाच SIT मध्ये घेणार, असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना दिले आहे.
आम्हाला न्याय पाहिजे : धनंजय देशमुख

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, अधिवेशनात सांगितले होते तेच आता आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे की गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही. या प्रकरणाबाबत आम्ही चर्चा केली आहे. आमच्याकडे काही गोष्टी होत्या त्या दाखवल्या आहेत. आम्हाला न्याय पाहिजे आम्ही सांगितले आहे. आम्ही न्यायाची भूमिका मांडली आहे.
नि:पक्षपातीपणे याबाबत चौकशी झाली पाहिजे : धनंजय देशमुख

धनंजय देशमुख म्हणाले, राजीनाम्याबाबत ते बघतील ते मुख्यमंत्री आहेत. नि:पक्षपातीपणे याबाबत चौकशी झाली पाहिजे . आम्ही जे एफआयआर आहे त्याप्रमाणे बोलणे झाले. जी घटना घडली त्या कालावधीत सीडीआर आहे तो काढावा अशी मागणी केली आहे. पुरावे जे एफआयर आहेत. वाल्मीक कराडचे सुद्धा एफआयआर दिले आहेत

Reactions

Post a Comment

0 Comments