मोहोळ नगरपरिषदेच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीला स्थगिती देण्याची मागणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषदेने सुरू केलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रियेला स्थगिती देऊन मोहोळ शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे उपस्थित होते.
मोहोळ नगरपरिषदेने २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी, गाळे भाडेवाढ, कमर्शियल कर व इतर कर भरमसाठ वाढवले आहेत. त्यामुळे मोहोळ शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना कराचा बोजा जास्तीचा पडत आहे. या करवाढीला स्थगिती मिळून मोहोळ शहरातल्या नागरिकांना दिलासा मिळावा, अशा प्रकारची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी करण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सकारात्मक शेरा मारला असल्याची माहिती रमेश बारसकर यांनी दिली.
0 Comments