विदया विकास तंत्रनितेकन मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानास उस्फुर्त प्रतिसाद
सोलापूर (कटुसत्य वृत्त ) सोलापूर येथील विदया विकास तंत्रानितेकन मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियान सुरु आहे यामध्ये ग्रंथालय स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, सामुहिक वाचन, संवाद लेखन, पुस्तक परिक्षण व कथा स्पर्धा आयोजित करून वाचन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. ग्रंथालयात यावेळी ग्रंथप्रदर्शन उदघाटना वेळी संस्थेचे संस्थापक सचिव अमोल (नाना) चव्हाण, कॅम्पस डायरेक्टर डॉ. अरुण गायकवाड, प्राचार्य डॉ. सुनीलदत्त कुलकर्णी, प्रथम वर्ष इनचार्ज डॉ एस एन चव्हाण, ग्रंथपाल श्री चंद्रकांत नवत्रे, विभाग प्रमुख प्रा. मनोज ढोबळे, प्रा. अनिल काळे, प्रा. जुबेर शेख, प्रा. सत्यशीला वामन, प्रा. रेखा बिरादार व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
व्यत्कीमत्व विकास संवाद कौशल्य विकसित होण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन व वाचन या सारखे उपक्रम राबविणे हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक सचिव अमोल (नाना) चव्हाण यांनी केले.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम त्यानुसार पंधरा तारखेपर्यंत पंधरवडा साजरा होत असून ग्रंथालयातील वाचन कक्षात सामुहिक वाचन घेण्यात आले. विदयार्थ्याना निरंतर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कौशल्य संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुस्तक परीक्षण स्पर्धेमधील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ सुनीलदत्त कुलकर्णी यांनी दिली.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ . प्रा. जी के देशमुख, संस्थेचे संस्थापक सचिव अमोल (नाना) चव्हाण व संस्थेचे विश्वस्त श्री. मधुकर कटकधोंड यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments